Sat, Sep 21, 2019 04:03होमपेज › Solapur › नागनहळ्ळीत जुगार अड्ड्यावर छापा; 7 जणांना अटक

नागनहळ्ळीत जुगार अड्ड्यावर छापा; 7 जणांना अटक

Published On: Dec 05 2017 1:41AM | Last Updated: Dec 04 2017 10:44PM

बुकमार्क करा

अक्‍कलकोट : प्रतिनिधी

नागनहळ्ळी येथे रस्त्यालगत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या विशेष टीमने छापा टाकून सात जणांना अटक करून त्यांच्याकडून 2 लाख 16 हजार 605 रुपयांचा ऐवज ताब्यात घेतला.

सिद्धाराम हणमंत चुंगीकर (वय 52), महाटेश्‍वर सुभाष प्याटी (30), निरंजन शिवशंकर कमलापुरे  (40), गणेश चंद्रकांत जाधव (36), शेखर अर्जुन शिंपाळे (30), मौला वजीर शेख  (42), अशोक अर्जुन साळुंखे (34, सर्व रा. अक्‍कलकोट) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहे. ते मन्‍ना नावाचा जुगार खेळत होते. त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सुमारे 2 लाख 16 हजार 605 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध अक्‍कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांच्या मार्गदशनाखाली पो.स.ई. गणेश निंबाळकर, पो.कॉ. श्रीकांत जवळगे, सिद्धाराम स्वामी, अमोल माने, पांडुरंग केंद्रे यांनी केली.