Wed, Apr 24, 2019 21:53होमपेज › Solapur › छिंदम प्रकरणी लोखंडी सावरगाव येथे बसवर दगडफेक 

छिंदम प्रकरणी लोखंडी सावरगाव येथे बसवर दगडफेक 

Published On: Feb 17 2018 5:55PM | Last Updated: Feb 17 2018 5:55PMअंबाजोगाई :  प्रतिनिधी 

अंबाजोगाई तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथे आडस फाट्यानजीक पंढरपूर - मंगरूळपीर बसवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी सकाळी पावने बाराच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान बसवर चोहीकडून निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमच्या निषेधाचे पोस्टर्स लावण्यात आली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  पोलिस निरीक्षक सुरेंद्र गंदम, पोलिस कर्मचारी बाळासाहेब डापकर, वैजनाथ नागरगोजे यांनी  घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. याप्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्यावरून अज्ञात व्यक्तींविरूद्ध गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे. 

शनिवारी सकाळी पावने बारा वाजता पंढरपूर - मंगरूळपीर बस क्रमांक एम.एच.40 वाय 5217 अंबाजोगाईच्या दिशेने निघाली होती. लोखंडी सावरगाव येथे आडस फाट्यानजीक बस समोर येऊन  कांहीजणांनी बस थांबवली व दगडफेक करत काचा फोडल्या. खबरदारी म्हणून चालक व वाहकांनी प्रवाशांना खाली उतरावले. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. दगडफेकीत पन्नास हजार रूपयाचे नुकसान झाले असल्याचे  पोलीसांनी सांगितले. यावेळी बसवर अज्ञात  व्यक्तींनी निलंबित उपमहापौर श्रीपाद छिंदमच्या निषेधाचे पोस्टर्स लावले.