Sun, Aug 25, 2019 12:17होमपेज › Solapur › माजी महापौरांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

माजी महापौरांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा

Published On: Feb 15 2018 1:58AM | Last Updated: Feb 14 2018 8:25PMसोलापूर : प्रतिनिधी
बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून जागेची परस्पर विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी माजी महापौरांसह तिघांविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विठ्ठल करबसू जाधव (वय 62, रा.  भैरू वस्ती, लिमयेवाडी), यल्लप्पा काशिनाथ जाधव (34), संतोष काशिनाथ जाधव ( 27, दोघे रा. शहानगर, भटक्या-विमुक्‍त झोपडपट्टी, वांगी रोड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत सचिन लक्ष्मण तळभंडारे यांनी फिर्याद दाखल केली आहे. सचिन तळभंडारे यास वारसा हक्‍काने मिळालेली व तळभंडारेच्या मालकीची उत्तर सोलापूर तालुक्यातील गट नं. 30 मधील 1 हेक्टर 63 आर या जागेचे  विठ्ठल जाधव यांनी बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून घेतले. 

सवास्तविक हे कुलमुखत्यारपत्र देणारे पांडुरंग भगवान तळभंडारे व मल्लिकार्जुन भैरू तळभंडारे हे कुलमुखत्यारपत्र देण्यापूर्वीच मृत झालेले असताना त्यांना हयात दाखवून व   खरेदीच्यावेळी  हजर दाखवून बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करण्यात आले. त्यानंतर विठ्ठल जाधव यांनी यल्लप्पा जाधव व संतोष जाधव यांच्याशी संगनमत करून 17 ऑगस्ट 2017 रोजी दुय्यम निबंधक कार्यालयात जागेची परस्पर विक्री करून फसवणूक केली म्हणून जाधव यांच्यासह तिघांविरुध्द कारवाई करण्याबाबत तळभंडारे यांनी पोलिस आयुक्‍तांकडे तक्रारी अर्ज केला होता.