Fri, Apr 26, 2019 10:10होमपेज › Solapur › सोलापुरात ऑर्केस्ट्रा बारवर छापा; १० बारगर्लसह १४ जण ताब्यात

सोलापुरात ऑर्केस्ट्रा बारवर छापा; १० बारगर्लसह १४ जण ताब्यात

Published On: Feb 19 2018 10:54PM | Last Updated: Feb 19 2018 10:47PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर-पुणे महामार्गावरील हॉटेल पॅराडाईज या डान्स बारवर फौजदार चावडी पोलिसांनी रविवारी पहाटेच्या अडीचच्या सुमारास छापा टाकला. यावेळी  तोकड्या  कपड्यांमध्ये डान्स करणार्‍या परराज्यांतील 10 बार गर्ल्ससह 14 जणांना ताब्यात घेण्यात आले. याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सचिन जाधव, रोहित राहुल गायकवाड, पिंकी सुनील विश्‍वकर्मा, रीता जगदीश दास, मोनिका विजय मुजुमदार, प्रियांका गुलदास दास, मनीषा अनिस  शेख, अंत्रोळी मेधाशिस चक्रवर्ती, काजोल  संतोष  दास, पौर्णिमा वासुदेव विश्‍वास, रचना मंगल मंडूल, किशोर अर्जन बासपोर, जय मोतीलाल हलदार अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस नाईक निशिकांत नागनाथ जोंधळे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

सोलापूर-पुणे महामार्गावरील शिवाजीनगर  येथील   हॉटेल   पॅराडाईज ऑर्केस्ट्रा बार या ठिकाणी काही युवती तोडके कपडे घालून अश्‍लील नृत्य करीत असल्याची माहिती फौजदार चावडी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास हॉटेल पॅराडाईजवर छापा मारला. त्यावेळी पिंकी  विश्‍वकर्मा, रिता  दास, मोनिका विजय मुजुमदार, प्रियांका दास, मनिषा  शेख, अंत्रोळी चक्रवर्ती, काजोल   दास, पौर्णिमा विश्‍वास,  रचना  मंडल या परराज्यांतील बार गर्ल्स तोकड्या कपड्यांमध्ये 

डान्स करीत असताना मिळून आल्या. यावेळी बारमधून सचिन जाधव, रोहित गायकवाड, किशोर बासपोर, जय हलदार या चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी 9 हजार 830 रुपयांची रोकडही जप्त केली.

यावेळी पोलिसांनी बारच्या कागदपत्रांची तपासणी केली असता या ऑर्केस्ट्रा बारमध्ये सर्व विभागाच्या शासकीय नियमांची पायमल्ली करून नियमभंग होत असल्याचे दिसून आले.  त्यामुळे याबाबत फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक शहाजी पवार तपास करीत आहेत.