Tue, Nov 20, 2018 01:19होमपेज › Solapur › बार्शीत अवैध वाळू उपसाप्रकरणी कारवाई, ९३ लाखांचा मुद्देमाल जप्‍त

बार्शीत अवैध वाळू उपसाप्रकरणी कारवाई, ९३ लाखांचा मुद्देमाल जप्‍त

Published On: Feb 24 2018 9:40PM | Last Updated: Feb 24 2018 9:39PMवैराग : प्रतिनिधी 

बार्शी तालुक्यातील घाणेगांव येथे भोगावती व निलकंठा नदी पात्रातून अवैध वाळू उपसा करणार्‍यांवर कारवाई करण्यात आली. जिल्‍हा पोलिसांच्या विशेष पथकाने केलेल्या या कारवाईत दोन जेसीप, चार ट्रॅक्‍टर, दोन हायवा टिपर, एक पिकअप, टेम्‍पो, तीन दुचाकी, सात मोबाईलसह ९३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला. तसेच अवैध वाळू उपसाप्रकरणी १७ जणांविरोधात वैराग पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. 

सोलापूर पोलिसांनी शनिवारी केलेली ही कारावई आतापर्यंतची दुसरी मोठी कारवाई असल्याने वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. याप्रकरणी मारुती बाळासाहेब गाटे रा सारोळे, भाऊ भागवत चवरे, सतिश उत्तरेश्वर गटकुळ, श्रीराम परमेश्वर बचुटे तिघे रा .घाणेगांव, अमोल दादा मोरे, विक्रम पोपट खताळ, नवनाथ विनायक मोरे तिघे रा. साकत, बालाजी अर्जुन ताटे रा. पानगांव, लखन भारत गाटे, सैफन गालिब शेख, नितिकेश पंडितराव जावळे - पाटील, लखन सूर्यकांत मगर, राम सूर्यकांत मगर,  सादिक जहांगीर शेख, नानासाहेब रामभाऊ मलमे, नागनाथ रामभाऊ मलमे, अमोल बाळकृष्ण येळणे,  सर्व राहणार वैराग यांच्या विरोधात वाळू चोरीप्रकरणी गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्यांच्याविरोधात दमदाटी, शिवीगाळ, धक्काबुक्की करून शासकीय कामात अडथळा या गुन्‍ह्यांचीही नोंद झाली आहे. 

कोणत्याही स्‍थितीत अवैध वाळू उपसा झालेला खपवून घेतला जाणार नाही. इथून पुढे केवळ वाहनांवर गुन्हे दाखल होणार नाहीत तर दंडात्मक कारवाई कशी करता येईल ते पाहीले जाणार आहे. याशिवाय लोकप्रतिनिधी, पोलिस पाटील यांच्या विरोधात देखील नोटीस बजावल्या आहेत.
 ऋषिकेत शेळके, तहसिलदार बार्शी