Fri, Jul 19, 2019 07:11होमपेज › Solapur › ओमप्रकाशचा अपघाती मृत्यू; ऑस्ट्रेलिया पोलिसांची माहिती

ओमप्रकाशचा अपघाती मृत्यू; ऑस्ट्रेलिया पोलिसांची माहिती

Published On: Apr 24 2018 1:08AM | Last Updated: Apr 23 2018 1:23AMपंढरपूर : प्रतिनिधी

ऑस्ट्रेलियामध्ये अभियांत्रिकीच्या उच्च शिक्षणासाठी गेलेल्या ओमप्रकाश  महादेव ठाकरे (वय 22) या विद्यार्थ्याच्या मृत्यूचे कारण अपघात असल्याची माहिती ऑस्ट्रेलियन पोलिसांनी रविवारी ओमप्रकाशच्या कुटुंबीयांना दिली आहे. दरम्यान, ओमप्रकाशचे पार्थिव सोमवारी ताब्यात मिळण्याची शक्यता असून मंगळवारी त्याच्यावर कोरफळ (ता. बार्शी ) या मूळ गावी अंत्यसंस्कार होणार आहेत. 

येथील भारतीय जीवन महामंडळात विकास अधिकारी असलेल्या महादेव ठाकरे यांचा ओमप्रकाश  ऑस्ट्रेलियात शिक्षणासाठी आहे. शनिवारी  त्याच्या मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली. मात्र, मृत्यूचे कारण  शनिवारी समजू शकले नव्हते.  त्याने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली होती. मात्र, रविवारी ऑस्ट्रेलियन पोलिसांकडून मृत्यूचे कारण अपघात असल्याचे सांगण्यात आले आहे. हा अपघात नेमका कशा प्रकारचा आहे, कसा झाला,  याबाबतचा खुलासा रविवारीसुद्धा होऊ शकलेला नाही. ओमप्रकाशच्या सोबत शिक्षणाच्या निमित्त राहणार्‍या पुणे येथील मित्राकडूनही अद्याप नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. त्यामुळे ओमप्रकाशचा अपघाती मृत्यू झाला, त्याचे आत्महत्या केली की काही घातपात झाला याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. 

ऑस्ट्रेलियात शनिवार आणि रविवार अशा सलग सुट्ट्या असल्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पार पाडण्यास  दोन दिवस विलंब लागला आहे. सोमवारी ओमप्रकाशच्या  पार्थिवाचे शवविच्छेदन केले जाईल त्यानंतर त्याचे पार्थिव भारताकडे पाठवण्यात येईल. मंगळवारी त्यांच्या मुळ कोरफळ ( ता.बार्शी ) या गावी अंत्यसंस्कार केले जातील असे ओमप्रकाशच्या नातेवाईकांकडून सांगण्यात आले. 

भारतीय विद्यार्थ्यांसाठी ऑस्ट्रेलिया असुरक्षित

 मागील काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियात शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्यांवर शारीरिक हल्ले चढवण्यात आलेले आहे. काही विद्यार्थ्यांच्या हत्याही झाल्याची उदाहरणे आहेत. या पार्श्‍वभूमीवर भारतीय विद्यार्थ्यांसाठी ऑस्ट्रेलिया असुरक्षित असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. ओमप्रकाशच्या बाबतीत असाच काही प्रकार झाला असेल का, याबाबत परराष्ट्र मंत्रालय पातळीवरून चौकशी केली जावी, अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे. 

Tags : Omprakas, Accident, death, Pandharpur, Australia,