Fri, Apr 26, 2019 19:18होमपेज › Solapur › पंढरपूरमध्ये भीषण अपघातात माय लेकराचा मृत्यू 

पंढरपूरमध्ये भीषण अपघातात माय लेकराचा मृत्यू 

Published On: Apr 26 2018 12:21PM | Last Updated: Apr 26 2018 12:21PMकरकंब (ता. पंढरपूर ) : वार्ताहर

करकंब-टेम्भुर्णी रोडवर खंडोबा मंदिराजवळ एसटी बस (एम एच-०६एस- ८०८२) आणि दुचाकी (एम एच १४ ए एन २८८५) यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील माय लेकराचा जागीच मृत्यू झाला तर, एक मुलगी गंभीर जखमी झाली आहे. जखमी मुलीला उपचारासाठी सोलापूर येथील रूग्‍णालयात दाखल करण्यात आले आहे. 

भुषण भारत गायकवाड (वय २१) आणि उषा भारत गायकवाड (वय, ३५) अशी अपघातात मृत्‍यू झालेल्‍या आई आणि मुलाचे नाव आहे. तर, मृणाली भारत गायकवाड (वय, १७) असे जखमी झालेल्‍या मुलीचे नाव आहे. 

 याबाबत अधिक माहिती अशी, करकंब-टेंभुर्णी रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सुरू असून, रस्त्यावर खडी व खड्डे आहेत. रस्‍त्‍यावरील खडी आणि खड्यामुळे गाडीवरील ताबा सुटून हा अपघात झाला असल्याची घटनास्‍थळी चर्चा सुरु होती. अपघाताची माहिती मिळताच करकंब येथील ग्रा. पं. सदस्य सतिश माने आणि ग्रामस्थांनी जखमीला रुग्णालयात उपचारासाठी नेहण्यास मदत केली.

Tags : pandharpur, taluka, karakamb, village, pandharpur, tembhurni, rood, accident, mother, son