Mon, Nov 19, 2018 19:47होमपेज › Solapur › मोहोळ : दुचाकी अपघातात आईसह मुलाचा मृत्यू

मोहोळ : दुचाकी अपघातात आईसह मुलाचा मृत्यू

Published On: Dec 04 2017 10:34AM | Last Updated: Dec 04 2017 11:40AM

बुकमार्क करा

मोहोळ : प्रतिनिधी

मालट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्‍याने झालेल्‍या अपघातात आई आणि मृलाचा जागीच मृत्‍यू झाला. प्रविण सर्जेराव भोसले(वय, २५) आणि आविंदा सर्जेराव पाटील (वय, ४६ रा. पाटील वस्‍ती, पापरी, ता. मोहोळ) असे मृत्‍यू झालेल्‍या दोघांची नावे आहेत. आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मोहोळ-पंढरपूर मार्गावर पोखरापूरनजीक हा अपघात झाला. 

प्रविण आणि आविंदा हे दोघे दुचाकीवरून नातेवाईकाच्या तिसऱ्या दिवसाच्या विधीसाठी खरसोळी येथे जात होते. यावेळी मोहोळ-पंढरपूर राज्य मार्गावर पोखरापूरजवळ मालट्रकने त्‍यांच्या दुचाकीला धडक दिली. यात दोघांचाही जागीच मृत्‍यू झाला. अपघातानंतर मालट्रक तसाच सोलापूरच्या दिशेने निघून गेला. मात्र, घटनास्थळी मालट्रकच्या बंपरचा प्लॅस्टीक तुकडा सापडला त्यावर मालट्रकचा कमांक (MH १३ AX ३७६१) व सुभाष असे लिहलेले होते. त्यावरून पोलिस हवालदार नागनाथ निंबाळे यांनी सावळेश्वर टोल नाका फुटेजवरून मालट्रकचा फोटो मिळविला. त्यामध्ये ट्रकची समोरची बाजूचे बंपर देखील तुटल्याचे दिसून आले.

या बाबत हरिश्चंद्र पांडूरंग भोसले याच्या फिर्यादीनंतर मोहोळ पोलिसांनी संबधीत ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघाताचा तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली नागनाथ निंबाळे करत आहेत.

दरम्‍यान, मोहोळ परिसरात मागच्या १५ दिवसांत विविध अपघातात १४ जणांचा मृत्‍यू झाला आहे.