Sat, Jun 06, 2020 08:01होमपेज › Solapur › नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, १० ठार

नाशिक : मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, १० ठार

Published On: Jun 07 2018 7:44AM | Last Updated: Jun 07 2018 9:49AMचांदवड (जि. नाशिक) : प्रतिनिधी

मुंबई-आग्रा महामार्गावरील सोग्रस जवळ वाळूची गाडी आणि मिनी ट्रॅव्हल्स यांच्यात झालेल्‍या भीषण अपघातात १० जण ठार झाले आहेत. तर, १३ जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिनी ट्रॅव्हल्स मधील सर्व प्रवाशी कल्याण येथील आहेत, ते मध्यप्रदेश मधील उज्जैन येथून परत कल्याणकडे जात होते. सोग्रस जवळ आल्‍यानंतर  ट्रॅव्हल्‍सने वाळूच्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात ५ जण जागीच ठार झाले तर, ५ जणांचा उपचार सुरु असताना मृत्‍यू झाला. या अपघातात १३ जण गंभीर जखमी झाले. जखमींना स्‍थानिक नागरिकांनी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघात झालेली ट्रव्हल्‍स उल्हासनगर येथील आहे. 

Tags : accident, mumbai agra highway, nashik