Fri, Mar 22, 2019 23:01होमपेज › Solapur › कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्‍वाराचा मृत्‍यू 

कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्‍वाराचा मृत्‍यू 

Published On: Aug 09 2018 6:24PM | Last Updated: Aug 09 2018 6:24PMमोहोळ : वार्ताहर 

कंटेनरने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्‍या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे. नागेश विलास आदलिंगे (वय ३५ रा. नागनाथ गल्ली, मोहोळ) असे अपघातात ठार झालेल्‍या व्यक्तीचे नाव आहे. हा अपघात मोहोळ तालुक्यातील पिंपरी गावच्या शिवारात विजापूर महामार्गावर झाला.

 याबाबत सविस्तर वृत्त असे की, नागेश आपल्‍या दुचाकीवरून (क्र. एम. एच. १३. बी. झेड ३११५) कुरुलकडे निघाले होते. सायंकाळी ४ वाजता त्यांची मोटार सायकल विजापूर महामार्गावरील नजिक पिंपरी येथे आली. त्यावेळी मोहोळच्या दिशेने भरधाव वेगात आलेल्‍या कंटेनरने ( क्र. एन.एल.०१.ए.बी ०४६९) त्‍यांच्या गाडीला जोराची धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, नागेश यांचा जागील मृत्‍यू झाला.  

या प्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात  कंटेनर चालक म. नसीम म.जहीर (रा.सराईमकई ता. लालगंज जि.प्रतापगड/यु.पी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.