Sun, Sep 23, 2018 21:39



होमपेज › Solapur › भीषण अपघातात सात ठार

भीषण अपघातात सात ठार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा





लातूर : प्रतिनिधी

थांबलेल्या टेम्पोला ओव्हरटेक करताना दोन क्रूझर आदळून झालेल्या भीषण अपघातात सात ठार, तेरा जण जखमी झाले. लातूर-नांदेड राज्यमार्गावरील कोळपापाटीजवळ पहाटे चार वाजता  हा अपघात झाला. जखमींवर लातूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

लातूर रोड येथे पहाटे रेल्वेला उतरलेले प्रवासी घेऊन एमएच 24 व्ही 1104 ही क्रूझर गाडी लातूरकडे भरधाव वेगात येत होती. कोळपापाटीनजीक असलेल्या गोरक्षणजवळ मालवाहू टेम्पो थांबला होता. त्याला ओव्हरटेक करीत असताना ती तिच्याविरुद्ध दिशेने येत असलेल्या एमएच 13 बीएन 2454 या दुसर्‍या क्रूझरवर जोरात आदळली. यात प्रवासी असलेल्या क्रूझरचा चक्‍काचूर झाला. क्रूझरचे टप तुटून दूरवर जाऊन पडले. त्यातील सहा जण जागीच ठार झाले, तर चार गंभीर जखमी झाले.

दुसर्‍या क्रूझरमधील नऊ जण जखमी झाले. अपघातानंतर उपस्थित लोकांनी अपघातग्रस्तांना कारबाहेर काढले. अपघाताची माहिती कळताच पोलिस व 108 च्या दोन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या व जखमींना लातूरला  हलविण्यात आले. 

अपघातातील मृतांची नावे

विजय तुकाराम पांदे (वय 30, रा. दापूर, ता. सिन्‍नर, जि. नाशिक), तुकाराम ज्ञानोबा दळवे (35, रा. दापेगाव, ता. औसा), उमाकांत सोपान कासले (40), मीना उमाकांत कासले (40, दोघेही रा. रेणापूर नाका, लातूर), शुभम शरद शिंदे (24, रा. बेलपिंपळगाव, ता. जि. अहमदनगर), मनोज चंद्रकांत शिंदे (25, रा. वैशालीनगर, बाभळगाव) व दत्तू बळीराम शिंदे (35, रा. हिंपळनरी, ता. मुखेड, जि. नांदेड).

जखमींची नावे

अर्जुन रामराव राठोड (वय 27, परतूर, जि. जालना), शब्बीर बालेखाँ खान (19, रा. निलंगा), कृष्णा दौलत भवर (19, रा. नाशिक), मल्‍लिकार्जुन गोविंद होडे (32, गातेगाव, ता. लातूर), वैष्णवी धनंजय भालेराव (18, दीपज्योतीनगर, लातूर), मदन विठ्ठल पवार (23, रा. औरंगाबाद), शेख इम्रान इम्तेयाज (19, रा. चाकूर), गणेश उमाकांत कासले (12, रा. रेणापूर नाका, लातूर), विद्या धनंजय भालेराव (42, दीपज्योतीनगर, लातूर), ज्ञानेश उमाकांत कासले (11, रा. रेणापूर नाका, लातूर), रामराव मारोती घुगरे (49, रा. नाशिक), रविदास जयराम सानप (34, रा. नवी मुंबई) व अजय दयानंद वाघमारे (24, लातूर रोड, लातूर).