Mon, Apr 22, 2019 02:22होमपेज › Solapur › रोपळे येथे ट्रकने धडक दिल्याने विद्यार्थी ठार

रोपळे येथे ट्रकने धडक दिल्याने विद्यार्थी ठार

Published On: Jan 01 2018 2:09AM | Last Updated: Dec 31 2017 8:39PM

बुकमार्क करा
कुर्डुवाडी :

माढा तालुक्यातील रोपळे (क) येथील पवार वस्तीजवळ बोअरच्या ट्रकने पहिलीमध्ये शिकणार्‍या सहा वर्षीय शाळकरी मुलास जोरात धडक दिल्याने तो गंभीर जखमी होऊन उपचारापूर्वी मृत झाला. ही घटना शनिवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास घडली. पवार वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिलीत शिकणारा सौरभ आप्पा पवार (वय 6, रा. रोपळे, ता. माढा) हा शाळा सुटल्यानंतर शाळेतून घराकडे रस्त्याच्या कडेने चालला होता. त्यावेळी रस्ता ओलांडताना त्याला बोअरच्या ट्रकने जोरात धडक दिली. त्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.