Fri, Jul 19, 2019 19:49होमपेज › Solapur › सोलापूर : टेंभुर्णी-पंढरपूर रोडवर अपघात; विठ्ठलभक्तामुळे  वारकरी बचावले

सोलापूर : टेंभुर्णी-पंढरपूर रोडवर अपघात; विठ्ठलभक्तामुळे  वारकरी बचावले

Published On: Jul 23 2018 10:22AM | Last Updated: Jul 23 2018 10:22AMकरकंब : वार्ताहर

आषाढी एकादशीला पंढरपूर ला निघालेल्या पनवेल येथील वाहनाचा करकंब हद्दीतील शेटेवस्ती येथे आज (दि.२३) रोजी पहाटे चार वाजण्याच्या  सुमारास चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने अपघात झाला असून या अपघातात सहा वारकरी जखमी झाले आहेत.

अपघात झाला त्या ठिकाणी राहणाऱ्या सुभाष नामदेव शेटे यांना पहाटे कोणीतरी ओरडत असल्याचा आवाज आला. विठ्ठल भक्त माळकरी सुभाष नामदेव शेटे यांनी अपघात झालेल्या ठिकाणी धाव घेत अपघातातील  सहा जखमींना सुखरुप बाहेर काढुन उपचारासाठी पाठवले.

उपचार घेतल्यानंतर जखमी झालेल्या प्रवासी वारकऱ्यांनी सुभाष शेटे यांचे आभार मानून त्यांच्या रुपात विठ्ठल भेटल्याचे समाधान व्यक्त केले.

सुभाष नामदेव शेटे यांनी तात्काळ अपघातग्रस्तांना मदत केल्याबद्दल करकंब पोलिस स्टेशनचे सपोनि उमेश धुमाळ यांनी त्यांचे अभिनंदन केले.