Mon, Apr 22, 2019 11:39होमपेज › Solapur › निवडणूक कामात दांडी मारणार्‍यांवर गुन्हे दाखल

निवडणूक कामात दांडी मारणार्‍यांवर गुन्हे दाखल

Published On: Feb 11 2018 10:41PM | Last Updated: Feb 11 2018 10:24PMहंजगी : प्रतिनिधी 

अक्कलकोट तालुक्यात सध्या एकूण 2 सार्वत्रिक ग्रामपंचायत व 19 ग्रामपंचायतींच्या 29 रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकांकरीता निवडणूक लागली आहे. या पोटनिवडणूक कामात कामचुकार करणार्‍या अक्कलकोट तालुक्यातील विविध विभागांतील अधिकार्‍यांवर अक्कलकोट तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी हणमंत कोळेकर यांनी दिलेल्या आदेशावरून कुळकायदा अव्वल कारकून व निवडणूक अव्वल कारकून विजयकुमार गायकवाड यांनी रितसर अक्कलकोट उत्तर पोलिस स्टेशनमध्ये  याबाबत त्या अधिकार्‍यांना वैयक्तिक जबाबदार  धरले आहे. 

त्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 23 च्यानुसार भंग केल्याच्या कारणावरून अक्कलकोट तालुक्यातील  बांधकाम उपविभाग अभियंता एम.आर. मसुती, लघुसिंचन (जलसंधारण)अभियंता एस. एस. पाटील, जि. प. उपविभाग बांधकाम अभियंता डी. बी. शिवशरण, सार्व. बांधकाम उपविभाग अभियंता  एस. एस. राऊळ या चार अभियंत्यांवर अक्कलकोट तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांनी 8 तारखेला गुन्हा दाखल केला आहे. 

तहसीलदार यांनी ग्रामपंचायत निवडणूकसंदर्भात ड्यूटी नेमली असता ते 8 फेब्रुवारी 2018 सायंकाळी 6 वाजेपर्यंत कर्तव्यावर हजर झालेले नसल्याने ही तातडीची कारवाई करण्यात आली आहे.