Fri, Apr 26, 2019 15:21होमपेज › Solapur › जि.प. क्रीडा स्पर्धेला थाटात सुरुवात

जि.प. क्रीडा स्पर्धेला थाटात सुरुवात

Published On: Dec 13 2017 2:00AM | Last Updated: Dec 12 2017 10:27PM

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या  पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा स्पर्धेचा शुभारंभ मंगळवारी सकाळी नेहरुनगर येथील शासकीय मैदानात जि.प. उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या नेतृत्वाखालील अधिकार्‍यांची टीम जोमात दिसून आली, तर जि.प. अध्यक्ष संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अपेक्षित असणारी पदाधिकार्‍यांची टीम मात्र स्पिचवर गायब असल्याचे दिसून आले. 

जिल्हा परिषदेच्यावतीने दरवर्षी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. पदाधिकारी, अधिकारी व कर्मचार्‍यांत खेळमेळीचे वातावरण निर्माण व्हावे, आरोग्याची जनजागृती व्हावी, सदृढ आरोग्याची नांदी लागावी या हेतूने या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदाही सलग तीन दिवस या उपक्रमातून विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 
स्पर्धेच्या शुभारंभाप्रसंगी मुख्य डॉ. राजेंद्र भारुड, अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी पी.व्ही. बनसोडे, लेखा व वित्त अधिकारी गौतम जगदाळे, प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी परमेश्‍वर राऊत, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, अविनाश गोडसे, सचिन जाधव, चंद्रकांत होळकर आदींसह अन्य पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.