Wed, Apr 24, 2019 15:51होमपेज › Solapur › जि.प.सदस्या शैला गोडसे यांचा शिवसेनेत प्रवेश

जि.प.सदस्या शैला गोडसे यांचा शिवसेनेत प्रवेश

Published On: Aug 29 2018 1:44AM | Last Updated: Aug 28 2018 11:39PMपंढरपूर : प्रतिनिधी 

अपक्ष जिल्हा परिषद सदस्या सौ. शैला धनंजय गोडसे यांनी मंगळवारी येथील मेळाव्यात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख आ. तानाजी सावंत, करमाळ्याचे आ. नारायण पाटील, नूतन जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, गणेश वानकर आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक व गोडसे समर्थक उपस्थित होते. 

येथील श्रीराम मंगल कार्यालयात झालेल्या या पक्ष प्रवेश मेळाव्यात शैला गोडसे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी आ. तानाजी सावंत यांनी सौ. गोडसे यांचे पुष्पगुच्छ देऊन तसेच भगवा दुपट्टा देऊन शिवसेनेत स्वागत केले. 

यावेळी बोलताना आ. तानाजी सावंत यांनी, शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वप्न साकार करण्यासाठी शिवसैनिकांनी जशाला तसे उत्तर देऊन काम करावे. सोलापूर जिल्ह्यात मी शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीर उभा आहे. 

कोणत्या पक्षासोबत युती करायची की नाही हे पक्षप्रमुख ठरवतील शिवसैनिकांनी मात्र पडेल ती जबाबदारी घेऊन निवडणूकीसाठी कामाला लागावे असे आवाहन केले. 
यावेळी बोलताना सौ. शैला गोडसे म्हणाल्या की, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विचार आणि पक्षाचे काम पटल्यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश करीत असून यापुढे शिवसेनेच्या धोरणाप्रमाणे, पक्षश्रेष्ठी देतील ती जबाबदारी प्रमाणिकपणे, निष्ठेने पार पाडणार आहोत. 

यावेळी जिल्हा समन्वयक प्रा.शिवाजी सावंत, माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव, मोहोळच्या माजी नगराध्यक्षा श्रीमती सीमाताई गायकवाड, दिपक गायकवाड, सोलापूर जिल्ह्याचे सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील,  मंगळवेढा तालुकाप्रमुख प्रा. येताळा भगत, अनिल सावंत, जिल्हाउपप्रमुख महावीर देशमूख, संजय घोडके, रवींद्र मुळे, सुधीर अभंगराव, युवा सेनेचे तालुकाप्रमुख योगेश चव्हाण , विठ्ठल जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.