Sat, Nov 17, 2018 08:38होमपेज › Solapur › बार्शीत जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने युवतींची रॅली

बार्शीत जिजाऊ ब्रिगेडच्यावतीने युवतींची रॅली

Published On: Jan 15 2018 1:45AM | Last Updated: Jan 14 2018 11:18PM

बुकमार्क करा
बार्शी : तालुका प्रतिनिधी 

राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त बार्शी शहर व तालुका  जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने महिला व युवतींची भव्य रॅली काढण्यात आली. बार्शी शहरात प्रथम काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये ‘तुमचं  आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, यासह जय शिवाजी जय भवानी’ आदी घोषणांनी शहर दुमदुमून गेले होते. महिलांनीच संपूर्ण नियोजन केलेल्या रॅलीत युवतींनी जिजाऊंचा वेष परिधान केल्यामुळे वातावरण शिवमय झाले होते. 

शिवाजी महाविद्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रॅलीची सुरुवात करण्यात आली. महाद्वार चौक, पटेल चौक, पांडे चौकमार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्याजवळ रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीत माधवराव देशमुख यांच्या विद्यार्थ्यांनींनी काठी, लाठी, तलवारबाजी, मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक करून दाखवले. रॅलीमध्ये महिला व बालकल्याण सभापती सोनल होनमाने, संगीता मिरगणे, प्रमोदिनी फुरडे, रेखा तुपे, भाग्यश्री देशमुख, दीपाली देशमुख, शालिनी देशमुख, प्रमिला मोरे या महिला सहभागी झाल्या होत्या. 

तसेच जिजाऊ जयंतीनिमित्त 3 व 12 जानेवारी रोजी ग्रामीण रुग्णालयात जन्मलेल्या मुलींचे स्वागत करून त्यांची नावे जिजाऊ व सावित्री ठेवावीत, अशी विनंती करण्यात आली. 
कार्यक्रम पार पाडण्यासाठी जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका अध्यक्षा सुवर्णा शिवपुरे, शहराध्यक्षा राजश्री डमरे-तलवाड, उपाध्यक्षा रेणुका जाधव, निवेदिता आरगडे, गौरी काळे, वर्षा घाडगे, संगीता पवार, अनिता पायघन, दिव्या सुरवसे, अपर्णा जाधव, मनिषा बारंगुळे, कोमल दळवी यांनी परिश्रम घेतले.