होमपेज › Solapur › पंढरपूर-उमदी राष्ट्रीय महामार्गाचे काम युवक काँग्रेसने पाडले बंद; दोन तास रास्तारोको

पंढरपूर-उमदी राष्ट्रीय महामार्गाचे काम युवक काँग्रेसने पाडले बंद; दोन तास रास्तारोको

Published On: Apr 07 2018 11:06PM | Last Updated: Apr 07 2018 9:27PMपंढरपूर : प्रतिनिधी

पंढरपूर ते उमदी या राष्ट्रीय महामार्गाचे काम शेतकर्‍यांना विश्‍वासात न घेता व कोणत्याही स्वरूपाची नोटीस न पाठविता अचानकपणे सुरू करण्यात आले. यासाठी रस्त्यावरील झाडे, घरे, दुकाने ही पाडण्यास सुरूवात करून लोकांना बेघर करण्याचे काम सरकार व प्रशासन करीत आहे. यामुळे युवक काँग्रेसच्या  वतीने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष नितीन नागणे यांच्या नेतृत्वाखाली मरवडे (ता.मंगळवेढा)  रास्तारोको आंदोलन करून काम बंद पाडले. यावेळी सुमारे 8 ते 10 किलो मीटर वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. सुमारे 2 तासाच्या रास्तारोको आंदोलनानंतर पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे व नायब तहसिलदार गणेश लव्हे यांनी आंदोलनकर्त्यांसमोर शेतकर्‍यांना विश्‍वासात घेवूनच त्यांना योग्य तो मोबदला देवूनच यापुढे काम सुरू करण्यात येईल असे आश्‍वासन दिल्यामुळे रास्तारोको मागे घेण्यात आला.

यावेळी सतीश शिंदे, दत्तागण पाटील, धनंजय गणपाटील, राजाराम कोळी, रमेश शिंदे, हैदर केंगार, दादासोा पवार, संजय पवार, विजय पवार, नारायण कोळी, पांडुरंग जाधव, भुसे सर, बंडू गायकवाड, दत्ता मासाळ, आनंदा जाधव, विशाल घुले, माणिक पवार यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.