Tue, Jul 07, 2020 05:55होमपेज › Solapur › मोहोळ : लग्न जमत नसल्याने तरुणाची आत्महत्या

मोहोळ : लग्न जमत नसल्याने तरुणाची आत्महत्या

Last Updated: May 29 2020 11:47AM
मोहोळ : पुढारी वृत्तसेवा 

लग्न जमत नसल्यामुळे ३५ वर्षीय इसमाने दारुच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मोहोळ तालुक्यातील तांबोळे गावात घडली. २९ मे रोजी सकाळी ७ वाजता उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली. सयाजी उर्फ सोन्या दत्तात्रय मोहिते (वय ३५ वर्षे रा. तांबोळे ता. मोहोळ) असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे. या घटनेची नोंद मोहोळ पोलिसात करण्यात आली आहे.

अधिक वाचा : कोरोना रुग्ण सापडल्याने वैराग सील, मात्र ग्रामपंचायतीत रंगली दारू पार्टी!

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, सयाजी उर्फ सोन्या मोहिते याचे गेल्या अनेक वर्षांपासून लग्न जमत नव्हते. त्यामुळे त्याला दारूचे व्यसन लागले होते. अनेक मुली पाहूनही लग्न जमत नसल्यामुळे त्याला नैराश्य आले होते. गेल्या दोन दिवसापासून तो तणावात वावरत होता. २८ मे रोजी रात्री त्याच्या घरातील लोक जेवण करुन झोपले होते.

अधिक वाचा : जिल्ह्यातील 8 तालुक्यांत कोरोना विषाणूचा शिरकाव

त्यानंतर रात्रीच्या सुमारास त्याने नैराश्यापोटी राहत्या घराच्या दरवाज्याच्या चौकटीला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना २९ मे रोजी सकाळी ७ वाजता उघडकीस आली. घटनेची माहिती मिळताच मोहोळ पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मोहोळच्या शासकीय रुग्णालयात पाठवून दिला. या प्रकरणी मोहोळ पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल लोभू चव्हाण हे करीत आहेत. अनपेक्षितपणे घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे तांबोळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

अधिक वाचा : जिल्ह्यातील 8 तालुक्यांत कोरोना विषाणूचा शिरकाव