Sun, Jun 16, 2019 12:09
    ब्रेकिंग    होमपेज › Solapur › सोलापूरच्या उद्योजकांचा युरोपमध्ये झेंडा, युरोपमध्ये खरेदी केली कंपनी

सोलापूरच्या उद्योजकाने खरेदी केली युरोपची कंपनी

Published On: Mar 25 2018 6:59PM | Last Updated: Mar 25 2018 6:59PMसोलापूर : प्रतिनिधी

सोलापूरचे उद्योजक यतीन शहा यांनी युरोपमध्ये आपला भारतीय झेंडा रोवला आहे. यतीन शहा यांनी जर्मनीस्थित ‘एम.एफ.टी.’(मोटोरेन उंड फारझोईग टेक्निक जीएमबीएच) या कंपनीत ७६ टक्के समभाग प्रिसिजनने खरेदी केला आहे. तर ‘प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड’ या कंपनीच्या दुसऱ्या संपादनाची घोषणा केली आहे. 

प्रिसिजन कंपनी ही कॅमशाफ्ट्स उत्पादनाच्रा बाबतीत वन स्टॉप सोल्रूशन म्हणून ओळखली जाते. चिल्ड कास्ट आरर्न, डक्टाईल आरर्न, हारब्रीड व असेंबल्ड कॅमशाफ्ट्सची निर्मिती करत गुणवत्तेमध्रे प्रिसिजनने जागतिक पातळीवर बेंचमार्क निर्माण केले आहे. उत्कृष्ट व्यवस्थापन, तंत्रज्ञान आणि प्रक्रिया आदींच्या बळावर प्रिसिजनने आतापर्यंत 60 दशलक्षपेक्षाही अधिक दोषरहित कॅमशाफ्ट्सचा पुरवठा केला आहे. स्थापनेपासूनच प्रत्येक क्षेत्रात यशाचा चढता आलेख पाहणाऱ्या प्रिसिजनच्या ग्राहकांच्या  यादीत फोर्ड मोटर्स, जनरल मोटर्स, टोरोटा, मारूती सुझुकी, ह्यूंदाई, डेमलर, पोर्श्‍चे यासारख्या जगभरातील नामांकित वाहन उत्पादक कंपन्यांचा समावेश आहे. 

संपादनाची घोषणा करताना प्रिसिजनचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा म्हणाले की, ‘जर्मनीतील एम.एफ.टी. रा कंपनीचे संपादन करताना आम्हाला आनंद होत आहे. रा मूल्रवर्धित संपादनामुळे नवीन उत्पादनांबाबत व्यवसायात आणखी संधी मिळू शकतील आणि प्रिसिजनला ग्लोबल ब्रँड म्हणून स्थिरावण्यास मदत होईल. एम.एफ.टी.चे संपादन हे प्रिसिजनच्रा सध्यांच्या ग्राहकांसोबत व्यवसायवृद्धी करेलच शिवाय ग्राहकाधारही वाढण्यासाठी फायदेशीर ठरेल. मेम्को आणि एम.एफ.टी. या दोन कंपन्या खरेदी केल्राने प्रिसिजन आपल्या मुख्य व्यवसायावर लक्ष केंद्रीत करत असतानाच निर्धारित उद्दिष्टाकडे वेगाने वाटचाल करेल. शिवाय नियोजित व्यावसायिक प्रकल्पांची अंमलबजावणी आणि हाती असलेल्रा व्यवसायवृद्धीच्या संधींचा उपयोग करण्यासाठीही प्रिसिजन प्रयत्नशील राहील.’

एम.एफ.टी. जर्मनी या कंपनीकडून फोक्सवॅगन, ऑडी, ओपेल, वेस्टफॅलिआ, हॅट्झ, सुझुकी अशा नामांकित ग्राहकांना बॅलन्सर शाफ्ट, कॅमशाफ्ट, बेअरिंग कॅप्स, इंजिन ब्रॅकेट्स आणि अन्र प्रिझमॅटिक कंपोनन्ट्सचा पुरवठा केला जातो. जर्मनीमध्रे कूनवाल्ड या पोलंड आणि झेक  देशांच्या सीमेवरील गावात एम.एफ.टी. कंपनी कार्यरत आहे. एम.एफ.टी.च्रा ‘स्टेट ऑफ आर्ट’ उत्पादन सुविधांमधून स्पर्धात्मक उत्पादन खर्चामध्ये पुरवठा केला जातो. मशिनिंग तंत्रज्ञानाचे सखोल ज्ञान असलेल्या गिडो ग्लिन्सकी यांच्या नेतृत्वाखाली ही कंपनी व्यवसायवृद्धीशी एकनिष्ठआहे.

याखरेदी व्यवहाराची माहिती देताना एम.एफ.टी.चे व्यवस्थापकीर संचालक गिडो ग्लिन्सकी म्हणाले की, ‘पीसीएल (इंटरनॅशनल) होल्डींग्ज बी.व्ही.’ने मोठी गुंतवणूक केल्याने एम.एफ.टी.ला जागतिक पातळीवर आपले पाऊल अधिक घट्ट रोवता येईल. जर्मन आणि युरोपिरन वाहन उत्पादकांच्या संशोधन आणि विकास विभागांशी थेट संपर्क साधणे सोपे होईल. तसेच वाहन उद्योगात होणार्‍रा क्रांतीकारी बदलांना आकार देणे आणि भविष्रातील आव्हानांना तोंड देणे शक्य होणार आहे. तर यासंधीचा उपयोग करून घेत शाश्‍वत वृद्धीसाठी प्रिसिजन समूह म्हणून एकत्रित चालण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. एम.एफ.टी.चे व्यवस्थापकीय संचालक ग्लिन्सकी यांच्याकडे 24 टक्के समभाग राहणार आहे. 

अलीकडेच प्रिसिजनने जनरल मोटर्सकडून जागतिक पातळीवरील 580 कोटींचा आणि फोर्ड मोटर्सकडून 550 कोटी रूपयांचा व्यवसाय केला आहे. हे दोन्ही कायमस्वरूपी प्रकल्प सध्या विकासाच्या पातळीवर असून 2018-19 या आर्थिक वर्षात नियमित उत्पादनाला सुरूवात होईल. राशिवार फोर्ड, जनरल मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांच्याकडूनही एकत्रित फुल्ली मशीन्ड कॅमशाफ्ट्सचा 275 कोटी रूपरांचा कायमस्वरूपी व्यवसाय प्राप्त झाला आहे. 

 

Tags : solapur, solapur news, Yatin Shah, Germany Company, shares,