Fri, Jan 18, 2019 12:03होमपेज › Solapur › स्त्री अधिक कणखर झाली पाहिजे: रजनीताई देशमुख

स्त्री अधिक कणखर झाली पाहिजे: रजनीताई देशमुख

Published On: Feb 05 2018 11:00PM | Last Updated: Feb 05 2018 10:48PMकरकंब : वार्ताहर

शेती करणारी, नोकरी व उद्योग व्यवसाय करणारी स्त्री कोणत्याही संकटाला कणखरपणे सामोरे जाते. तिला अधिक बळ देऊन अधिक खणखर बनविले पाहिजे. असे मत महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रजनीताई देशमुख यांनी व्यक्‍त केले.

करकंब येथील ग्रामीण रुग्णालयात ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ उपक्रमांतर्गत  नवीन जन्मास आलेल्या मुलींच्या स्वागताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी माजी जि.प. सदस्य बाळासाहेब देशमुख, डॉ. तुषार सरवदे, डॉ. प्रभा साखरे, दिलीप व्यवहारे, सचिन शिंदे, डॉ. जमीर कडगे, डॉ. संग्राम गाडेकर, डॉ. हिम्मतराव बागल, सुजाता लाटणे,  बेसुळके आदींसह अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, स्तनदा माता उपस्थित होत्या.

ग्रामीण रुग्णालयात मुलींना जन्म  देणार्‍या मातांमध्ये पूनम गायकवाड, अमृता मोहिते, रेश्मा माने, सारिका वसेकर, मोनिका पिळवे, काजल कदम, स्वप्नाली तळेकर, मोहिनी ओव्हाळ आदींना बेबी कीट देऊन सभापती रजनीताई देशमुख यांनी सन्मानीत केले.

याप्रसंगी माजी जि.प. सदस्य बाळासाहेब देशमुख यांनी करकंब ग्रामीण रुग्णालयाने अधिक चांगल्या पद्धतीने सेवा दिल्याने रुग्णालयाचा राज्यात 5 वा क्रमांक आला आहे. त्याबद्दल कौतुक करून लवकरच करकंबमध्ये पायलट प्रोजेक्ट सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले.

यावेळी शैलजा मुखरे, डॉ. प्रभा साखरे, सचिन शिंदे, स्वाती टेके, पर्यवेक्षिका बेसुळके आदींनी मनोगत व्यक्‍त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. तुषार सरवदे यांनी केले.तर आभार डॉ. गणेश धोत्रे यांनी मानले.

दररोज 300 रुग्णांची तपासणी
रुग्णालयात दैनंदिन 250ते 300 रुग्णांची तर मासिक 5 ते 6 हजार रुग्णांची तपासणी केली जात आहे.चालू वर्षी 321 बिनटाका शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून जानेवारी महिन्यात 60 महिलांच्या प्रसुती झाल्या आहेत. रुग्णालयात सर्व प्रकारच्या लसी उपलब्ध असल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. रुग्णांची वाढती संख्या विचारात घेवून रिक्‍त असलेल्या 10 जागा शासनाने भरून घ्याव्यात. भारनियमन टाळण्यासाठी जनरेटरची सुविधा उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे.