Tue, Apr 23, 2019 13:59होमपेज › Solapur › वेल्डिंगच्या ठिणगीने ट्रक पेटला; ६ लाखांचे नुकसान

वेल्डिंगच्या ठिणगीने ट्रक पेटला; ६ लाखांचे नुकसान

Published On: Mar 19 2018 10:28PM | Last Updated: Mar 19 2018 9:59PMसोलापूर : प्रतिनिधी 

सोलापूर-पुणे महामार्गावरील बाळे येथे एका वेल्डिंगच्या दुकानात वेल्डिंग करताना ट्रकमधील प्लास्टिक साहित्याने पेट घेतला. यामध्ये ट्रकचे केबीन व प्लास्टिकचे कॅरेट जळून सुमारे 6 लाख रुपयांचे नुकसान झाले. बाळे येथे एका वेल्डिंगच्या दुकानात एक ट्रक वेल्डिंग करण्यासाठी थांबला होता. 

दुकानातील वेल्डर ट्रकमध्ये वेल्डिंगचे काम करीत होता. ट्रकमध्ये द्राक्षासाठी लागणारे प्लास्टिकचे कॅरेट होते. वेल्डिंग करताना त्याची ठिणगी पडून ट्रकमधील प्लास्टिकच्या कॅरेटने पेट घेतला. बघताबघता आग वाढत गेली व आगीने ट्रकच्या केबीनला आपल्या कवेत घेतले. त्यामुळे आकाशात मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरले होते. याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या दोन बंबांनी घटनास्थळी येऊन पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणली. या आगीमध्ये 6 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची नोंद अग्निशामक दलाकडे करण्यात आली आहे.

Tags : solapur,Welding spark, truck burn, 6 lakhs loss,