Mon, Jun 17, 2019 02:15होमपेज › Solapur › केंद्र शासनाने साखर निर्यातीबाबत घेतलेल्या निर्णयाचे स्वागत :दिलीप वळसे-पाटील

केंद्र शासनाने साखर निर्यातीबाबत घेतलेल्या निर्णयाचे स्वागत :दिलीप वळसे-पाटील

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सोलापूर : प्रतिनिधी

राष्ट्रीय सहकारी साखर महासंघ, दिल्‍ली यांनी केलेल्या सातत्यपूर्ण व पाठपुराव्यामुळे थोड्या उशिराने का होईना पण अखेर केंद्र शासनाने देशातील साखर उद्योगाला व पर्यायाने ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देणारे जे दोन महत्त्वपूर्ण निर्णय एकाच दिवशी घेतले आहेत त्याचे देशातील सर्व 254 सहकारी साखर कारखान्यांची शिखर संस्था राष्ट्रीय सहकारी साखर महासंघातर्फे आम्ही स्वागत करतो, असे महासंघाचे अध्यक्ष आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी परिपत्रकाद्वारे म्हटले आहे.

गेल्यावर्षी झालेल्या सर्वदूर समाधानकारक पर्जन्यवृष्टीमुळे व परतीच्या पावसामुळे उभ्या उसाचे वजन व साखरेचे प्रमाण वाढले. त्यामुळे हंगामापूर्वी केलेल्या 251 लाख टन साखर उत्पादनाच्या अंदाजापेक्षा 45-50 लाख टनाची साखर जास्त तयार झाली. हंगाम सुरुवातीच्या 40 लाख टन शिलकीत 295-300 लाख टन नव्या साखरेची भर पडली. त्यामुळे देशपातळीवर 335-340 लाख टन इतकी प्रचंड उपलब्धता होऊन त्यातून 255 लाख टनाचा स्थानिक खपवजा जाता हंगाम अखेर 80-85 लाख टनाची शिल्‍लक राहणार असल्याचे केंद्र शासनाच्या अन्न व वाणिज्य मंत्रालयाचे लक्ष राष्ट्रीय सहकारी महासंघाने सर्वप्रथम वेधले व त्यानंतर ‘इस्मा’सह पाठपुरावा जारी ठेऊन केंद्र शासनाकडून साखर निर्यातीबाबतचे हे दोन्ही महत्त्वपूर्ण निर्णय एकाच दिवशी मिळवण्यात यश प्राप्‍त केले.

एप्रिल ते सप्टेंबर 2018 दरम्यान करावयाच्या निर्यातीचा कारखानानिहाय कोटा व तो कोटा पूर्ण करण्याचा कारखान्यांना ऑक्टोबर 2019 ते सप्टेंबर 2021 दरम्यान शून्य टक्के आयातकराने कधी साखर आयातीचा परवाना देण्याचा अंतर्भाव या दोन्ही संलग्‍न बाबी या योजनांमध्ये आहेत. जरी सध्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील दराने निर्यात करून तोटा होणार असला तरी 20 लाख टन साखर देशाबाहेर जाणार असल्याने स्थानिक बाजारातील साखर दरातील अपेक्षित वाढ व शुल्कविरहित आयातीद्वारे मिळणारा लाभ लक्षात घेता साखर कारखान्यांची आर्थिक घडी सुस्थितीत येणार आहे व त्यामुळे ऊस उत्पादक शेतकर्‍यांना समाधानकारक ऊसदर देता येणार आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय साखर महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी दिली आहे.याबाबत राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केंद्र शासनकडून अशाच दिलासा देणार्‍या आणखी निर्णयांची अपेक्षा व्यक्‍त केली.

Tags : Solapur, Solapur News,  Dilip Walse Patil, Welcome, decision, Central Government,  sugar, export 


  •