Tue, Jun 25, 2019 13:07होमपेज › Solapur › हातमाग उत्पादनाच्या विक्रीसाठी मुंबई विमानतळावर दालन उपलब्ध करू

हातमाग उत्पादनाच्या विक्रीसाठी मुंबई विमानतळावर दालन उपलब्ध करू

Published On: Apr 24 2018 1:07AM | Last Updated: Apr 23 2018 10:13PMसोलापूर : प्रतिनिधी 

सोलापुरातील हातमाग विणकरांचे उत्पादन विक्रीसाठी मुंबई येथील विमानतळावर कायमस्वरुपी दालन उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.अक्कलकोट एमआयडीसी येथील यंत्रमाग उत्पादक संघाच्या सभागृहात विभागीय हातमाग कापड स्पर्धा झाली. स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभ वेळी ते बोलत होते. यावेळी उपसंचालक किरण सोनवणे, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, शहाजी पवार आदी उपस्थित होते.

ना. देशमुख म्हणाले, हातमाग व्यवसायातील कारागिरांना प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जाते.  कलात्मक आणि नावीन्यपूर्ण वाणाची उत्पादन करण्यास प्रोत्साहन मिळेल, असा विश्‍वास मला वाटतो.सोलापुरातील कारागिरांनी आता आपल्या उत्पादनाची मुंबई, पुणे शहरात मार्केटिंग करायला हवे. यासाठी राज्य शासन आवश्यक मदत करण्यासाठी तयार आहे, असे मंत्री देशमुख यांनी सांगितले.यावेळी सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजू राठी, यंत्रमाग उत्पादक संघाचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम, अविनाश बोमड्याल उपस्थित होते.उपसंचालक किरण सोनवणे यांनी प्रास्ताविक केले, तर सीमा माळी यांनी सूत्रसंचालन केले.  

स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून सोनवणे, उपजिल्हाधिकारी रेश्मा माळी, जिल्हा माहिती अधिकारी रविंद्र राऊत, सहाय्यक संचालक आर. एस. गोखले, एस. झेड. दंडोती, किसन पवार यांनी काम केले.

विभागीय हातमाग स्पर्धेतील विजेते :  प्रथम क्रमांकाचे विजेते स्पर्धक (विभागून) - विठोबा मोने, रेशीम साडी, व्यंकटेश मादगुंडी - रेशीम साडी, द्वितीय क्रमांकाचे विजेते स्पर्धक (विभागून) - श्रीनिवास अनंतुल - कोकणी साडी, लक्ष्मी पोतु - रेशीम साडी,  विजयालक्ष्मी जिंदम - वॉल हँगिंग, राजेशम सादुल - मोबाईल पाकीट, तृतीय क्रमांकाच्या पुरस्काराचे विजेते स्पर्धक   (विभागून)  - प्रभाकर कोडम - ड्रेसमटेरियल, प्रभाकर वडीशेरला - जाकीट, विनोद सणगर -सतरंजी, पेंटप्पा तुकाराम संभारम -टॉवेल, सत्यनारायण किडम -टॉवेल. या कार्यक्रमास कारखानदार, शासकीय अधिकारी, कामगार बहुसंख्येने उपस्थित होते.

Tags : Solapur, We, available, store, Mumbai airport, sale  hand loom, products