Wed, Apr 24, 2019 01:54होमपेज › Solapur › नीरा उजवा कालव्यातून सायफनद्वारे पाणी चोरी

नीरा उजवा कालव्यातून सायफनद्वारे पाणी चोरी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पिलीव : वार्ताहर 

उन्हाळी हंगामातील पिकांसाठी नीरा उजवा कालव्यातून दिनांक 10 मार्च पासून पाणी सोडण्यात आले असून टेल टू हेड पद्धतीने पाणी वाटप करण्याचे धोरण अवलंबिले जात आहे. मात्र सध्या खुडुस चौकी (77 फाटा) येथून फळवणी  चौकीपर्यंत थेट कालव्यातून सायफनव्दारे पाणी चोरी केली जात आहे.

मोठे बागायतदार पाटकर्‍याला  हाताशी धरून राजरोसपणे पाणी चोरून वापरतात. पाणी चोरीमध्ये बडे राजकीय पुढरी दिसून येतात. पाणी चोरी करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याबरोबर पंचनामे करून सातबारा उतार्‍यावर बोजा चढवणार  असल्याचे बोलले जात असले तरीसध्या पाटबंधारे विभाग शांत राहणेच पसंद करत आहे.  त्यामुळे रितसर परवाना काढणार्‍या शेतकर्‍यांवर अन्याय होत असल्याचे शेतकर्‍यातून बोलले जात आहे. 11 शेतकर्‍यांनी पाणी उचल परवाने काढले आहेत.

Tags : Solapur, Solapur News, Water, Siphon system, Nira, right, canal


  •