होमपेज › Solapur › पंढरपूर : विठूरायाला चंदनाचा लेप..(video)

पंढरपूर : विठूरायाला चंदनाचा लेप..(video)

Published On: Mar 20 2018 8:15AM | Last Updated: Mar 20 2018 8:15AMपंढरपूर : प्रतिनिधी

वैशाख वणव्याची दाहकता जणू चैत्रातच जाणवू लागल्याने विठ्ठलाच्या चंदन उटी पूजेला प्रारंभ झाला आहे. दरवर्षी विठ्ठल-रखुमाईच्या मूर्तींना उन्हाळ्यातील उष्णतेचा दाह लागू नये यासाठी चंदन उटी लावण्यात येते. या पुजेला सोमवारपासून प्रारंभ झाला.

चैत्र शुद्ध प्रतिपदा ते मृग नक्षत्र निघेपर्यंत ही पूजा नित्यनियमाने केली जाते.