होमपेज › Solapur › दडपणाखाली वावरणाऱ्या पंढरपूरकरांना आज "विश्वास" भेटणार!

दडपणाखाली वावरणाऱ्या पंढरपूरकरांना आज "विश्वास" भेटणार!

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

पंढरपूर : प्रतिनिधी

नगरसेवक संदीप पवार याच्या हत्येनंतर दडपणाखाली वावरणाऱ्या पंढरपूरच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील हे शनिवारी रात्री पंढरीत दाखल झाले आहेत. रविवारी ते शहरवासीयांशी मुक्तसंवाद साधणार आहेत.

नगरसेवक संदीप पवार यांच्या हत्येनंतर पंढरपूर शहरातील कयदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला असून ११ महिन्यात तीन खून झाल्यामुळे शहरातील जनता भयभीत झाली आहे. पोलिसांनी मारेकरी पकडले असले तरी अद्यापही खरे मारेकरी मोकाट असल्याचे सांगण्यात येते. अध्यात्मिक नगरी म्हणून ओळख असलेली पंढरी गुंडांचीनगरी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनीच पंढरपूर दौरा करून जनतेशी संवाद साधावा अशी मागणी जोर धरत होती.

या मागणीची दखल घेऊन नांगरे-पाटील शनिवारी रात्री पंढरीत दाखल झाले असून रविवारी सकाळी शहरातील तसेच तालुक्यातील कायदा सुव्यवस्थेचा ते आढावा घेऊन दुपारी शहरातील प्रतिष्ठित नागरिक आणि जनतेशी संवाद साधणार आहेत. या दौर्‍यातून दडपणाखाली वावरणाऱ्या जनतेच्या मनात निर्माण पोलिसांप्रती निर्माण झालेल्या अविश्वासाचे वातावरण दूर करण्याचा प्रयत्न विश्वास नांगरे-पाटील करतील अशी अपेक्षा सर्वसामान्यांना लागून राहिली आहे.


  •