Fri, Jul 19, 2019 20:05होमपेज › Solapur › सहा दरोडेखोरांना ग्रामस्थांनी पकडले

सहा दरोडेखोरांना ग्रामस्थांनी पकडले

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बार्शी : तालुका प्रतिनिधी 

दरोडा टाकण्याच्या उद्देशाने घातक शस्त्रांसह फिरणार्‍या उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा दरोडेखोरांना फपाळवाडी येथील ग्रामस्थांनी पकडले. त्यांना बार्शी व पांगरी पोलिसांनी जीपसह ताब्यात घेतले. ही घटना गुरुवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास फपाळवाडी (ता. बार्शी) शिवारातील मांगडे यांच्या शेताजवळील ओढ्याच्या पुलाजवळ घडली.

शंकर बापू काळे (वय 28), आबा आप्पा शिंदे (30, दोघेही रा. मोहा, ता. कळंब), दादा उद्धव चव्हाण (32), अनिल उद्धव चव्हाण, रमेश  उद्धव चव्हाण (27), दीपक बाबू पवार (21), सुरेश उद्धव चव्हाण (सर्व रा. राजेशनगर, ढोकी, उस्मानाबाद) अशी दरोडेखोरांची नावे आहेत. पोलिसांनी एमएच 12 बीव्ही 5247 ही स्कॉर्पिओ त्यांच्याकडून ताब्यात 
घेतली आहे. 

गुरुवार, 29 मार्च रोजी सकाळी फपाळवाडी येथील ग्रामस्थांनी संशयास्पद रीतीने फिरणार्‍या सहा दरोडेखोरांना  पकडून ठेवले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यांना ताब्यात घतले.दरम्यान, पळून गेलेल्या आबा शिंदे याला पांगरी पोलिसांनी स्कॉर्पिओसह ताब्यात घेतले.दरोडेखोरांची झडती घेतली असता, त्यांच्या खिशांत मिरचीची पूड व नायलॉन रस्सी मिळून आली. तसेच पोलिसांनी स्कॉर्पिओची तपासणी केली सीटखाली लोखंडी कोयता, एक कटावणी, एक एक्सा ब्लेड आदी दरोड्यासाठी लागणारा घातक शस्त्रसाठा मिळून आला.पकडलेल्या दरोडेखोरांना पोलिस ठाण्यात आणल्यावर त्यांच्याकडे चौकशी केली असता प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. मात्र त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता आपण फपाळवाडी येथे दरोडा टाकण्यासाठी आलो होतो, असे दरोडेखोरांनी सांगितले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. 

फपाळवाडी येथील ग्रामस्थांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल ग्रामस्थांचे अभिनंदन होत आहे. कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सात दरोडेखोरांवर दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत असल्याबाबत बार्शी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास स.पो.नि. दिगंबर गायकवाड हे करत आहेत. 

Tags : Solapur, Solapur News,  Villagers, caught, six, robbers


  •