Tue, Jul 07, 2020 20:53होमपेज › Solapur › ग्रामस्वच्छतेत तावशी जिल्ह्यात प्रथम

ग्रामस्वच्छतेत तावशी जिल्ह्यात प्रथम

Published On: Jun 12 2018 12:54AM | Last Updated: Jun 12 2018 12:07AMसोलापूर : प्रतिनिधी

सन 2017-18 मधील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेच्या जिल्हास्तर स्पर्धेमध्ये पंढरपूर तालुक्यातील तावशी ग्रामपंचायत प्रथम, मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी द्वितीय, तर करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत सरफडोह तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली.

सन 2017-18 मधील संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छग्राम स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय समितीने नुकतीच पात्र ग्रामपंचायतींची तपासणी केली होती. त्यात जिल्हास्तर स्पर्धेमधील पंढरपूर तालुक्यातील तावशी ग्रामपंचायत प्रथम क्रमांकासाठी पाच लाख रुपये, मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी द्वितीय क्रमांकासाठी तीन लाख रुपये, तर करमाळा तालुक्यातील ग्रामपंचायत सरफडोह तृतीय क्रमांकासाठी दोन लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात येणार आहे.

जिल्हास्तरीय पहिल्या तीन पारितोषिकप्राप्त ग्रामपंचायतीबरोबर जिल्हास्तरीय विशेष पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली असून पाणी गुणवत्ता, पिण्याचे पाणी व पाणी व्यवस्थापनाचा स्व.वसंतराव नाईक पुरस्कार सांगोला तालुक्यातील अजनाळे ग्रामपंचायत, कुटुंब कल्याण कार्यक्रमासाठी स्व.आबासाहेब खेडकर स्मृती पुरस्कार मंगळवेढा तालुक्यातील देगाव तसेच सामाजिक एकता व लोकसहभागासाठीचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार दक्षिण सोलापूर तालुक्यातील कारकल ग्रामपंचायतीस प्राप्त झाला आहे. या विशेष पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींसाठी प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांचा धनादेश देण्यात येणार आहे. उपमुख्य कार्यकारी अधिकारी  चंचल पाटील व उपमुख्य कार्यकारी अधिकारी विजय लोंढे व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव व कार्यकारी अभियंता कटकधोंड यांच्या पथकाने जिल्हास्तरीय ग्रामपंचायतींची तपासणी केली होती.

सदर अभियानामधील जिल्ह्यातील 11 तालुक्यातील पहिल्या तीन क्रमांक पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींसाठी अनुक्रमे एक लाख, पन्नास हजार व पंचवीस हजार रुपयांचा धनादेश देण्यात येणार आहे. तालुकास्तरीय निकाल पुढीलप्रमाणे : अक्कलकोट तालुका : प्रथम क्र. गौडगाव बु., द्वितीय क्र. चपळगाव व तृतीय क्र. समर्थ नगर. बार्शी तालुका : प्रथम क्र.शिराळे, द्वितीय क्र. जोतिबाचीवाडी, तृतीय क्र. शेळगाव आर., करमाळा तालुका : प्रथम क्र. सोगाव प., द्वितीय क्र. सरफडोह, तृतीय क्र. श्रीदेवीचामाळ. माढा तालुका : प्रथम क्र. वेणेगाव, द्वितीय क्र.आकुलगाव, तृतीय क्र. शिराळ टें. माळशिरस तालुका : प्रथम क्र. रेडे, द्वितीय क्र. मोरोची, तृतीय क्र.मोटेवाडी मा., मंगळवेढा तालुका : प्रथम क्र. ब्रह्मपुरी, द्वितीय क्र. देगाव, तृतीय क्र. गणेशवाडी. मोहोळ तालुका:  प्रथम क्र. ढोक बाभुळगाव, द्वितीय क्र. पाटकुल, तृतीय क्र. वडवळ. पंढरपूर तालुका : प्रथम क्र. वाखरी, द्वितीय क्र. तावशी, तृतीय क्र.व्होळे. सांगोला तालुका : प्रथम क्र. अजनाळे, द्वितीय क्र. यलमार मंगेवाडी, तृतीय क्र. चिणके. उत्तर सोलापूर : प्रथम क्र. हिरज, द्वितीय क्र. पाकणी, तृतीय क्र. सेवालाल नगर.  दक्षिण सोलापूर : प्रथम क्र.कारकल, द्वितीय क्र. वरळेगाव, तृतीय क्र.फताटेवाडी.

विजेत्या ग्रामपंचायतींचा शाश्‍वत आराखडा होणार : सीईओ डॉ. भारूड 

संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानमधील विजेत्या ग्रामपंचायतीचा शाश्‍वत स्वच्छतेचा आराखडा तयार करण्यात येणार असून, या ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी दिली. जूनअखेर या सर्व 39 ग्रामपंचायतींचा गौरव जिल्हास्तरावर करण्यात येईल. यंदा संत तुकडोजी महाराज स्वच्छ वॉर्ड स्पर्धेसाठी 1 कोटी रूपयांची बक्षिसे आहेत  व 68 जिल्हा परिषद गटासाठी बक्षिसे आहेत. यामध्येदेखील ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. यापुढे प्रत्येक ग्रामपंचायतींना सहभागी व्हावे लागणार आहे.