Mon, May 20, 2019 22:40होमपेज › Solapur › ‘विकास वेडा झाला आहे’ पुरस्काराचे प्रजासत्ताकदिनी वितरण

‘विकास वेडा झाला आहे’ पुरस्काराचे प्रजासत्ताकदिनी वितरण

Published On: Jan 25 2018 1:00AM | Last Updated: Jan 25 2018 1:00AMकरमाळा : तालुका प्रतिनिधी

करमाळा तालुक्यातील चार मंडळमधील असलेल्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेडने प्रजासत्ताक दिनी ‘विकास वेडा झाला’ या नावाने उपहासात्मक पुरस्काराचे आयोजन केले असून करमाळ्यातील चार मंडल व तालुका कृषी अधिकारी यांना हा उपहासात्मक पुरस्कार देऊन निषेध करण्यात येणार आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष अमित घोगरे यांनी दिली आहे.

करमाळा तालुक्यातील कृषी विभागाकडून राबविण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेंतर्गत विविध कामे त्याचबरोबर एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन क्षेत्र या कामाच्याबाबत वेळोवेळी माहिती मागितली असता ती वरिष्ठांच्या आदेशानंतरही दिली नाही. राज्य माहिती आयुक्त, पुणे यांच्या आदेशालाही केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे नाइलाजाने शासनाच्या स्लोगनप्रमाणे, करमाळा तालुक्याचा विकास वेडा झाला आहे काय? अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे करमाळा तालुक्यामध्ये अनोख्या पध्दतीने 26 जानेवारी 2018  यादिवशी करमाळा तालुक्यातील संभाजी ब्रिगेडच्या वतीने तालुका कृषी कार्यालय व सर्व मंडल कृषी कार्यालये यांना ‘तालुक्यातील विकास वेडा झाला आहे’ या नावाने पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती संभाजी ब्रिगेडचे शिवश्री अमित अशोक घोगरे यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे लेखी पत्रव्यवहार केला असून सदरच्या पत्रामध्ये त्यांनी म्हटले आहे की, करमाळा तालुक्यातील कृषी विभागाने जलयुक्त शिवार एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन क्षेत्र या कामाच्या तालुक्यातील ‘विकास वेडा झाला आहे’ त्यांच्यातील बदलच व इतर सर्व विकासकामांबद्दल करमाळा तालुक्यातील संभाजी ब्रिगेडच्या वतीने तालुका कृषी कार्यालय व सर्व मंडल कृषी कार्यालये यांना 26 जानेवारी 18 रोजी पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. प्रमाणपत्र, ट्रॉफी असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या उपहासात्मक कार्यक्रमास संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे. सदर निवेदनाच्या प्रती त्यांनी कृषी मंत्री यांच्यासह सर्व शासकीय पातळीवरील संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत.