Fri, Apr 26, 2019 19:28होमपेज › Solapur › माढा लोकसभेसाठी  मोहिते-पाटील यांनाच उमेदवारी मिळावी

माढा लोकसभेसाठी  मोहिते-पाटील यांनाच उमेदवारी मिळावी

Published On: Jun 23 2018 1:23AM | Last Updated: Jun 22 2018 8:51PMपिलीव : दामोदर लोखंडे

माढा लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रावादीलाच मिळणार असल्याने विद्यमान   खासदार  विजयसिंह मोहिते-पाटील यांनी माढा लोकसभा मतदार संघात जनताभिमूख कार्य केल्याने त्यांनाच उमेदवारी मिळावी त्यांनी नाकारल्यास माजी खा. रणजिसिंह मोहिते-पाटील यांना उमेदवारी मिळावी अशी मागणी मतदार संघातील युवकांमधून होत आहे.

मोदी लाटेतही 2014 साली अत्यंत प्रतिकूल परिस्थीतीत विजय मिळवल्यानंतर खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी आपल्या 4 वर्षाच्या कार्यकिर्दीत केंद्राच्या जास्तीत जास्त योजना तळागाळातील पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. संसदेमध्ये असून संसदेत मतदार  संघातील समस्या व योजना तारांकित प्रश्‍नाद्वारे विचारण्यात त्यांचा देशात चौथा  क्रमांक लागला आहे. त्यांच्या काळात पंढरपूर लोणंद रेल्वे मार्गाचे काम मार्गी लागले असून प्रत्यक्षात कामाची सुरुवात झाली आहे. 100 वर्षापासून मंजुर होऊन रखडलेले काम माजी खा. रणजिसिंह  मोहिते-पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे व खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांनी सतत प्रयत्न केल्यामुळे काम मार्गी लागले आहे.

मतदार संघातील मुख्य रस्त्याला जोडणारे 9 रस्त्याची  कामे मंजूर होऊन मार्गी लागली आहेत.  माळशिरस तालुक्यासाठी स्वतंत्र प्रांत कार्यालाय, पोलीस उप अधीक्षक कार्यालय, 3 तालुक्याचे बांधकाम कार्यालय, आर.टी.ओ. कार्यालय, जिल्हा सत्र न्यायालय, पाणी पुरवठा विभागाची विविध खात्याची कार्यालये, क्रीडा संकुल, कुर्डुवाडी येथील रेल्वे डबे तयार करण्याचा कारखाना कृष्णा भीमा स्थिरीकरण नद्या जोड प्रकल्प,  भीमा- नीरा नदीवर बंधारे, प्रवाशांच्या निवार्‍यांची सोय, पीक अप शेड, हायमास्ट दिवे, रुग्णांना मदत,  जलयूक्त शिवार योजनेअंतर्गत पाणी आडवा पाणी जिरवा, श्रमदानातून बंधारे आदीच्या जोरावर व जनतेच्या सहानभूतीच्या जोरावर विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या कामाचा विचार करता विजयसिंह मोहिते-पाटील यांनाच माढा लोकसभा मतदार संघातील त्यांनाच उमेदवारी मिळावी आशी मागणी जोर धरत आहे. 

माढा लोकसभा मातदार संघात सेवानिवृत्त कृषी आयुक्त व माण ( जि. सातारा ) येथील प्रभाकर देशमुख  मूळ रहिवाशी असलेने त्यांना या मतदार संघाची माहिती व समस्यांची जान आहे. प्रभाकर देशमुख यांचेही माढा लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार म्हणून नाव चर्चेत आले आहे. तसेच शिवसेनेने ही स्वबळाचा नारा जाहीर केल्यामुळे शिवसेनेतून शिवसेनेचे जिल्हा सहप्रमुख डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांचे  नाव चर्चेत आहे. तसेच भाजपच्यावतीने उत्तम जानकर यांचेही नाव चर्चेत असून विरोधकांकडून कुणीही उमेदवार असला राष्ट्रवादी काँग्रेसकडून खा. विजयसिंह मोहिते-पाटील किंवा माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यापैकीच कुणाला तरी उमेदवारी दिली जावी अशी मागणी होत आहे.