Wed, Apr 24, 2019 21:29होमपेज › Solapur › वेळापूर परिसरात वार्‍याचे थैमान

वेळापूर परिसरात वार्‍याचे थैमान

Published On: May 19 2018 10:03PM | Last Updated: May 19 2018 9:53PMवेळापूर : वार्ताहर

शुक्रवार (दि. 19)  रात्री झालेल्या वादळी वारे व गारपिटीमुळे वेळापूर परिसरात उभी पिके व घरांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. वादळी वार्‍याने अनेक ठिकाणी झाडे मुळासकट उन्मळून पडली. घरांचे पत्रे उडाल्याने अनेक कुटुंबे उघड्यावर आली. या नुकसानीचे महसूल विभागाकडून शनिवारी पंचनामे करण्यात आले.

शुक्रवारी रात्री पुणे-पंढरपूर रस्त्यावर पालखी मार्गावरील ठाकुरबुवा रस्त्यावर 4 झाडे पडल्याने रस्ता बंद झाला होता. रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान जेसीबी, ट्रॅक्टर व लाकूड कटरच्या मदतीने झाड बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केली.

या वादळामुळे ठाकूरबुवा मंदिर परिसरात चार झाडे तसेच येथील अक्षय पवार यांचे हॉटेलसमोर जुने बाभळीचे व पिंपळाचे झाड मुळासकट  उन्मळून पडले. तसेच शेतकरी मदनसिंह वसंतराव माने-देशमुख यांची अडीच एकर केळीची बाग जमीनदोस्त होऊन सुमारे साडेचार लाखाचे नुकसान झाले. याचा पंचनामा तलाठी  किसन शिंदे यांनी केला आहे. पालखी मार्गावरील हॉटेल सिद्धि गार्डन येथील बदामाचे मोठे झाड व स्त्यावर झाड पडले. धानोरे रोडवरील सुरेशराव जगदाळे-पाटील यांचे घरासमोरील मोठी बाभळीचे झाड पडले. तर निवृती भुसारे यांच्या शेतातील महावितरणचे चार खांब पडले.

उघडेवाडी (ता.माळशिरस)  येथील दगडु पांडुरंग खरवडे यांचे संपुर्ण घराचे पत्रे उडून गेल्याने कुटुंब उघड्यावर आले. शेतकरी राजकुमार अंबादास बाभळे यांचे सात एकर केळीच्या बागेचे व घराचे पाऊणेपाच लाखाचे नुकसान झाले. लक्ष्मण उपासे यांची पपईची सव्वा एकर बाग, गौरीशंकर सदाशिव लंबटकर तीन एकर पपई, रामदास विठ्ठल जगदाळे चार एकर चिकु व डाळिंब, विजयराज भगवान पांढरे, नारायन ज्ञानेश्‍वर पांढरे दोन एकर ऊस व दोन एकर डाळिंब, तानाजी मोहन साठे, बापु लोखंडे, पुरुषोतम बाळापुरे यांच्याही राहत्या घराचे पत्रे उडाले, भगवान शिवा कोळेकर पत्रा शेड उडाले. यामध्ये उघडेवाडीसह वेळापूर परिसरात वीस लाखाचे आसपास नुकसान झाले.