Tue, Mar 19, 2019 05:48होमपेज › Solapur › खळवे येथे वाळुतस्करांच्या हल्ल्यात दोन पोलिस जखमी

खळवे येथे वाळुतस्करांच्या हल्ल्यात दोन पोलिस जखमी

Published On: May 20 2018 10:25PM | Last Updated: May 20 2018 10:15PMवेळापूर : वार्ताहर

 खळवे (ता. माळशिरस) येथे माजी सरपंच असलेल्या वाळू तस्कराने पोलिस पथकावर हल्ला केल्याने 2 पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. 
खळवे येथे दारूवाल्यांवर कारवाईची नोटीस देण्याकरिता पोलिस कर्मचारी लक्ष्मण पिंगळे हे बोंडले येथे गेले होते. त्यावेळी खळवे येथे काही जण भीमा नदीत  वाळू काढत असल्याची माहिती मिळाली. लक्ष्मण पिंगळे यांनी पोलिस कर्मचारी दत्ता खरात व विनोद साठे यांना बोलावून घेऊन खळवे येथे नदीपात्रात  1.30 वाजता जाऊन पाहणी केली.  निळ्या रंगाचा डंपिंग ट्रेलर ट्रॅक्टर वाळू भरून नदीबाहेर येत असल्याचे  दिसून आले. तो ट्रॅक्टर पोलिसांनी खळवे-जांबुड रोडवर अडवला असता पोलिस पथकावर वाळू तस्कर व खळवेचा माजी सरपंच अण्णा कदम याने हल्ला केला. यामध्ये 2 पोलिस जखमी झाले.  यावेळी कदम याने मुलास  ट्रॅक्टर घेऊन जा कोणी आडवा आला, तर उडवून जा, असे सांगितले. ट्रॅक्टर घेऊन चालक पसार झाला. अण्णा कदम  यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मात्र, चालक वाहन घेऊन पळून गेला आहे. याची फिर्याद लक्ष्मणराव पिंगळे यांनी पोलिस स्टेशनला दिली आहे.