Wed, Mar 20, 2019 08:57होमपेज › Solapur › वाहन अडवणार्‍या पोलिसालाच मारहाण

वाहन अडवणार्‍या पोलिसालाच मारहाण

Published On: Aug 07 2018 1:02AM | Last Updated: Aug 06 2018 8:30PMसोलापूर : प्रतिनिधी  

साखर पेठेत एकान दुकानासमोर कर्तव्यावर असताना वेगाने येणार्‍या संशयास्पद चारचाकी वाहनाला अडवून विचारणा करणार्‍या पोलिस शिपायालाच सहाजणांनी चक्‍क रोडवर गचांडी पकडून शिवीगाळ केल्याची घटना रविवारी सोलापुरात घडली.  

याप्रकरणी जेलरोड पोलिसांत सहाजणांवर सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  यात पोलिस शिपाई शहाजी दत्तात्रय मंडले यांनी फिर्याद दिली. यावरून रशिद शेटे, जाफर म. युसूफ शेटे, मुज्जमिल शेटे (सर्व रा. शनिवार पेठ), बाबा जमखंडी (रा. शुक्रवार पेठ) यासह दोन अनोळखी अशा सहाजणांवर सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. 

फिर्यादी सकाळी सव्वाआठ वाजता टाटा इंडिगो कार (एमएच 12 बीव्ही 6876) संशयित स्थितीत असताना त्यास फिर्यादीने थांबण्याचा इशारा केला. परंतु कार न थांबवल्याने फिर्यादीने पाठलाग करून कार थांबवली. यात या सहाजणांनी बेकायदेशीर जमाव जमवून तू हमे पहचनता नही क्या, तुने हमारी गाडी क्यों रोकी असे म्हणून शिवीगाळ, धक्‍काबुक्‍की करून गणवेशाची गच्ची पकडून सरकारी कामात अडथळा आणून संशयास्पद चारचाकी घेऊन पळून गेल्याचे  फिर्यादीत नमूद केले आहे.