Wed, Jul 17, 2019 18:04होमपेज › Solapur › वैराग पोलिसांकडून २ लाखाचा गुटखा जप्त

वैराग पोलिसांकडून २ लाखाचा गुटखा जप्त

Published On: Feb 07 2018 5:32PM | Last Updated: Feb 07 2018 5:32PMवैराग  प्रतिनिधी 

बार्शी - कुर्डुवाडी रोडवर वांगरवाडी फाट्याजवळ बेवारस स्थितीत सुमारे दोन लाखांचा गुटखा वैराग पोलीसांना आढळून आला आहे. दोन फेब्रुवारी रोजी आढळलेला हा सहा पोती गुटखा सहा फेब्रुवारी रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, दोन फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता बार्शी -कुर्डुवाडी रोडवर वांगरवाडी फाट्याजवळ गुटखा उतरला गेल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी छापा टाकला असता, विविध सात कंपन्यांची पॅक पाच पोती व एक फोडलेले अशी सहा पोती गुटखा आढळून आला. एका झुडपामध्ये हा माल आढळल्याने पोलीसांच्या हाती कोणी लागले नाही. सुमारे दोन लाख रूपये किंमतीचा हा गुटखा चार दिवसांनी सोलापूरच्या अन्न व औषध प्रशासनाकडे सुपूर्त करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी विजय कबाडे व वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण अवचर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सचिन माने आणि पोलीस नाईक अमित घाडगे यांनी केली.