Tue, Nov 20, 2018 05:29होमपेज › Solapur › वैराग : पिकअप मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

वैराग : पिकअप मोटारसायकलच्या भीषण धडकेत एक ठार

Published On: Apr 20 2018 5:24PM | Last Updated: Apr 20 2018 5:24PMवैराग : प्रतिनिधी 

वैराग-सोलापूर रस्त्यावर राळेरास जवळील जनाबाई जाधव प्रशालेसमोर दुचाकी आणि पिकअपची समोरासमोर जोराची धडक झाली. या भिषण धडकेत  एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवार दि. २o रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली असून, मयत तरूणाचे नाव माऊली तुकाराम गुरव रा. धामणगाव (दु) असे आहे. खास मित्रांच्या लग्नासाठी पुण्यावरून आलेल्या माऊलीला अचानक अपघाताने हिरावून घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे

या बाबतची वैराग पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, माऊली गुरव हा पुण्यामध्ये खाजगी वाहनांवर चालक म्हणून काम करीत होता. दरम्यान धामणगाव ( दु) येथे मित्राचे लग्न असल्याने शुक्रवारी सकाळी गावी पोहचला. लग्न सकाळी साडेदहाला लावल्यानंतर वैरागहून कपडे आणण्यासाठी तो गेला होता. तेथून परतत असताना राळेरास जवळील जनाबाई जाधव प्रशालेच्या समोर दुचाकी क्रमांक एम् एच् १४- इ क्यू-९१५६ व पिकअप क्रमांक एम् एच् १३- सी यु-०६२४ यांची समोरासमोर धडक झाली. अपघात ऐवढा भीषण होता की, माऊली गुरव हा जागीच ठार झाला. वैराग पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक किरण अवचर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली. याबाबतची फिर्याद सुनिल तुकाराम गुरव यांनी वैराग पोलीस ठाण्यात दिली असून, पिकअप चालक तानाजी रविंद्र साठे रा .मुंगशी (आर ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे.