Tue, Jul 23, 2019 06:17होमपेज › Solapur › पत्नीचा विनयभंग करून पतीस मारहाण 

पत्नीचा विनयभंग करून पतीस मारहाण 

Published On: Mar 21 2018 5:53PM | Last Updated: Mar 21 2018 5:53PMवैराग : प्रतिनिधी

पत्नीचा विनयभंग करणाऱ्यास जाब विचारायला गेलेल्या फिर्यादीच्या पतीसचं  मारहाण करून जखमी केल्याची घटना १९ मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास बार्शी तालुक्यातील कोरफळे गावात घडली. या संदर्भात २० मार्च रोजी रात्री उशिरा वैराग पोलिसात एका जनाविरुध विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, कोरफळे येथील फिर्यादी महिला आपल्या घरात स्वयंपाक करित असताना आरोपी पांडुरंग प्रभाकर भोंगे हा तिथे आला. व त्‍या महिलेस तू मला खूप आवडते म्हणून तिचा हात धरून तीच्याशी जबरदस्‍ती करण्याचा प्रयत्‍न करू लागला. यावेळी संबधीत महिलेने  विरोध केला असता भोंगेने त्‍या महिलेला मारहाण केली. याघटनेचा जाब विचारण्यास फिर्यादीचा पती गेला असता, पांडुरंग भोंगे याने त्यालाही लाकडी ओडख्याने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी भोंगेवर विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याघटनेचा पुढील तपास सहायक पोलिस फौजदार सदाशिव गिड्डे करित आहेत.

Tags : Solapur ,vairag, one man, molesting, women, beating, husband,