Wed, Nov 21, 2018 06:04होमपेज › Solapur › बार्शीचे निर्भया पथक जिल्ह्यात अव्वल

बार्शीचे निर्भया पथक जिल्ह्यात अव्वल

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

वैराग : प्रतिनिधी

मुली व महिलांच्या छेडछाडीला आळा बसावा यासाठी जिल्हा पोलिसांच्यावतीने जिल्हाभर निर्मित केलेल्या निर्भया पोलिस पथकांमध्ये बार्शी उपविभाग निर्भया पथक अव्वल ठरले असून या पथकाचा गौरव विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

सन 2017-2018 या वर्षात बार्शी निर्भया पथकाने केवळ कारवाईच केल्या नाहीत, तर समुपदेशन व जनजागृतीदेखील केली आहे. त्यांचे हे प्रमाण जिल्ह्यात सर्वात सरस ठरल्याने त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या पथकाचा गौरव विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते, तर पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांच्या उपस्थित करण्यात आला. बार्शीचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या या पथकामध्ये पोलिस उपनिरीक्षक शिवकुमार जाधव, पोलिस नाईक विकास माने, महिला पो.ना. सविता जाधव, म. पो.कॉ. माधुरी फपाळ, म.पो.कॉ. माया भोसले, पो.कॉ. महेश बचुटे यांचा समावेश आहे.


  •