होमपेज › Solapur › तांबेवाडी जवळ अनोळखी तरुणाचा खून

तांबेवाडी जवळ अनोळखी तरुणाचा खून

Published On: Sep 04 2018 6:29PM | Last Updated: Sep 04 2018 6:29PMवैराग : प्रतिनिधी 

बार्शी तालुक्यातील तांबेवाडी शिवारात  एका अनोळखी तरुणाचा गळा आवळून खून झाल्‍याचे समोर आले आहे. यानंतर   पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत टाकून  दिल्याचे मिळून आले आहे. सदरची घटना मंगळवारी उघडकीस आली असून, वैराग पोलिसांत या घटनेची आकस्मित मृत्‍यू म्हणून नोंद  करण्यात आली आहे.

याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की , बार्शी तालुक्यातील तांबेवाडी ते  बोरगाव   रस्त्यावरील लहान पुलावर तांबेवाडी येथे सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एक अनओळखी पुरुष वय अंदाजे पस्तीस ते चाळीस वर्षे याचे प्रेत बेवारस स्थितीत मिळून आले. वैराग पोलिसांनी  पंचनामा करून प्रेत वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ .जयवंत गुंड यांनी शवविच्छेदन केले. यामध्ये  मयताचा मृत्यू गळा आवळून केला असल्याचा अहवाल दिला. त्यामुळे त्या अनओळखी तरुणाचा खून केला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे .याघटनेचा पुढील तपास पोहेकॉ जनार्धन सिरसट करीत आहेत .