होमपेज › Solapur › वैरागात १.१० लाखांचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त

वैरागात १.१० लाखांचा देशी-विदेशी मद्यसाठा जप्त

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

वैराग : प्रतिनिधी

वैराग पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध दारू विक्री धंद्यावर जिल्हा पोलिसप्रमुखांच्या विशेष पथकाने छापा टाकून वैरागमधील विविध ठिकाणी  दारूच्या अवैध धंद्यांवर कारवाई केली असून 1,08,735 रुपयांच्या देशी-विदेशी मद्याच्या बाटल्या जप्त केल्याप्रकरणी सहा आरोपींना विशेष पथकाच्या सदस्यांनी ताब्यात घेतले. ही कारवाई जिल्हा शाखेच्या विशेष पथकाने 29 मार्च रोजी रात्री उशिरा केली.

जिल्हा पोलिसप्रमुख वीरेश प्रभू यांच्याकडे आलेल्या तक्रारीवरून व त्यांच्या आदेशान्वये अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकामी वैराग पोलिस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना वैराग-बार्शी  मार्गावर  धनराज हॉटेलच्या पाठीमागे व वैराग-लाडोळे रस्त्याशेजारील पत्र्याचे शेड या ठिकाणी विक्री होत असलेल्या दारू अड्ड्यावर छापा टाकून अवैधरीत्या देशी-विदेशी दारू विक्री करीत जितेंद्र गुरुलिंग स्वामी (रा. मानेगाव, ता. बार्शी,) रामेश्‍वर विश्‍वनाथ स्वामी (रा. वैराग), आबासाहेब सदाशिव थोरात (रा. वैराग), धनंजय भारत गरड, जितेंद्र भारत गरड (रा. वैराग), अनिल परमेश्‍वर बचुटे (रा. घाणेगाव)  यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एकूण एक लाख आठ हजार सातशे पस्तीस रुपये किमतीची देशी-विदेशी दारू व मुद्देमाल जप्त केला.


  •