Sun, May 26, 2019 16:38होमपेज › Solapur › मंगळवेढा तालुक्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान 

मंगळवेढा तालुक्यात अवकाळी पावसाने मोठे नुकसान 

Published On: Feb 11 2019 8:46PM | Last Updated: Feb 11 2019 8:46PM
मंगळवेढा: तालुका प्रतिनिधी

तालुक्याच्या दक्षिण भागातील काही गावांना अवकाळी पावसाने झोडपले असून सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वारे सुटून पावसाला सुरुवात झाली. तालुक्यातील चिक्कलगी मारोळी शिरनांदगी रड्डे हुन्नूर या गावातील परिसराला वादळी अवकाळी पावसाचा तडाखा बसला यामध्ये डाळिंब, द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती समोर येत आहे. याशिवाय कडबा मकाकेंबाळ याचेही नुकसान झाले आहे. तालुक्याच्या दक्षिण भागात असलेली ही गावे दुष्काळी पट्टा म्हणून ओळखली जातात. या परिसरातील काही शेतकऱ्यांनी मोठ्या जिद्दीने बोअरच्या पाण्यावर तसेच टॅंकरने विकत पाणी घालून द्राक्ष बागांचे संगोपन केले होते, मात्र सोमवारी सायंकाळी झालेल्या पावसाने त्यांच्या आशेवर निराशेचे पाणी फिरले आहे.

गेल्या दोन वर्षात शासनाकडून अशाप्रकारे अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीबाबत कुठलीही मदत दिली नाही तहसीलकडून पंचनाम्याचे आदेश दिले जातात. शेतकऱ्यांना कागदपत्रांची पूर्तता करायला लावली जाते मात्र त्यानंतर शासन स्तरावरून कुठलीही नुकसान भरपाई मिळत नाही अशा परिस्थितीत निसर्गाने झोडपले आणि शासनाने छळले अशी अवस्था शेतकऱ्यांसमोर झाली आहे.