Wed, Jul 24, 2019 13:01होमपेज › Solapur › सोलापूर : राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना सव्वा लाखाची टोपी

सोलापूर : राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांना सव्वा लाखाची टोपी

Published On: Feb 08 2018 3:22PM | Last Updated: Feb 08 2018 3:22PM
सोलापूर : पुढारी ऑनलाईन

मोबाईलसाठी व्हीआयपी नंबर देतो असे सांगून एका ठकाने राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार दीपकआबा साळुंके यांना सव्वा लाख रुपयांना टोपी घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत खुद्दा साळुंके यांनीच सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

साळुंके यांना महादेव बगलामे या व्यक्तीने फोन करून मोबाईलसाठी व्हीआयपी नंबर हवा का अशी विचारणा करून आपल्या खात्यावर सव्वा लाख रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार साळुंके यांनी सदरची रक्कम जमा केली. परंतु, व्हीआयपी नंबर मिळाला नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर साळुंके यांनी संबंधित व्यक्ती विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.