Mon, Sep 24, 2018 03:17



होमपेज › Solapur › पंढरपूर : नगरसेवकावर दिवसाढवळ्या गोळीबार

पंढरपूर : नगरसेवकावर दिवसाढवळ्या गोळीबार

Published On: Mar 18 2018 1:56PM | Last Updated: Mar 18 2018 2:26PM



पंढरपूर (सोलापूर): प्रतिनिधी

पंढरपूर नगरपालिकेतील नगरसेवक संदीप पवार यांना शहरातील मध्यवर्ती असलेल्या स्टेशन रोडवरील एका हॉटेल जवळ अज्ञात युवकांनी गोळ्या घातल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी (18 मार्च) घडला. या प्रकारानंतर पवार यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

साहेब,‘मला पक्षातून काढण्याइतपत माझं काय चुकलं?’

रविवारी दुपारी एकच्या सुमारास पवार हे नियमितपणे स्टेशन रोडवरील हॉटेलमध्ये आले असता, याठिकाणी आधीच थांबलेल्या युवकांनी पवार यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात पवार गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पवार यांना पोलिस व्हॅनमधूनच रुग्णालयात दाखल केले. 

सोनियांच्या "डिनर डिप्लोमासी'ला महसूल मंत्र्यांकडून आव्हान(व्हिडिओ)

कामत व देवरा गट पुन्हा सक्रिय; काँग्रेसमध्ये निरुपम हटावचा नारा!

या घटनेनंतर शहरात तणावपूर्ण स्थिती असून, सर्व व्यापारी पेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. घटनेनंतर अप्पर पोलिस अधीक्षक निखील पिंगळे यांच्यासह पोलिस अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, घटना घडलेले ठिकाण सील करण्यात आले आहे. दरम्यान या गोळीबार करण्यामागे नेमके काय कारण आहे याचा पोलिस तपास करत आहेत.

Tags : Pandharpur, Corporator Sandeep Pawar, Pandharpur Nagarpalika