Thu, Jul 18, 2019 06:39होमपेज › Solapur › विद्यापीठ प्रशासनविरोधी याचिका दाखल

विद्यापीठ प्रशासनविरोधी याचिका दाखल

Published On: Apr 12 2018 10:30PM | Last Updated: Apr 12 2018 9:55PMसोलापूर : प्रतिनिधी

माजी कुलगुरू डॉ. मालदार, त्यांच्या काळातील भरती प्रक्रिया व इतर विविध विषयांसंदर्भात सोलापूर विद्यापीठ प्रशासनाविरोधात नुकतीच याचिका दाखल केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सोलापूर विद्यापीठ चर्चेत राहणार असल्याचे दिसून येत आहे.

महाराष्ट्र विद्यापीठ कायदा 2016 अंतर्गत प्रकरण 2 कलम 8 (6) 9 (3) अन्वये कलम 134, 12 (5) याप्रमाणे प्रभाकर आबाजी कुलकर्णी यांनी ही याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये प्रशासनामधील माजी कुलगुरू डॉ. एन. एन. मालदार व विद्यापीठातील अधिकारी आणि सोलापूर विद्यापीठ येथे झालेल्या भ्रष्टाचाराची दखल घेऊन संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. 

यामध्ये निर्बंध असताना 29 जणांची केलेली भरती, त्यांचा विद्यापीठ निधीतून होणारा पगार, यातील कर्मचारी सोडून जाताना त्यांच्याकडून 1 लाख रूपये नोटीस-पे घेणे, विद्यापीठ निधीतून माजी कुलगुरू डॉ. मालदार यांनी नियमबाह्य पध्दतीने वैद्यकीय बिलांचा परतावा घेणे, शासन अनुदानातून वेतननिश्‍चितीपेक्षा जादा वेतन माजी बीसीयुडी डायरेक्टर आर. वाय. पाटील यांना देणे, विद्यापीठातील खरेदी आदी विषयांवर राज्यपाल व कुलाधिपती यांनी चौकशी नेमून माजी कुलगुरू डॉ. मालदार व त्यांना सहकार्य करणार्‍या अधिकारी-कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी कुलकर्णी यांनी केली आहे. जेणेकरून विद्यार्थी, पालक व सामान्य जनतेस न्याय मिळेल.