Tue, Apr 23, 2019 22:01होमपेज › Solapur › मोहोळवासीयांची आदर्श निर्णयासाठी एकजूट

मोहोळवासीयांची आदर्श निर्णयासाठी एकजूट

Published On: Jan 23 2018 1:11AM | Last Updated: Jan 22 2018 10:18PMमोहोळ ः प्रतिनिधी

वारंवार पुकारण्यात येणार्‍या बंदमुळे मोहोळ शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त होत असून शहरासह तालुक्यातील आर्थिक व्यवहारावर होणारा परिणाम लक्षात घेता यापुढील काळात घडलेल्या घटनेचा सर्वपक्षीय, सर्वधर्मीय नागरिकांनी निषेध व्यक्त करायचा परंतु शहर बंद करुन व्यापार पेठ बंद ठेवायची नाही, असा निर्णय सर्वपक्षीय नेते, सामाजिक संघटना व व्यापारी यांच्या बैठकीत एकमताने घेण्यात आला.

अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे माजी सभापती तथा शहराचे ज्येष्ठ मार्गदर्शक शहाजहान शेख होते.राज्यात अथवा देशामध्ये विशिष्ट विघातक प्रवृत्ती समाजातील जातीय व धार्मिक सलोखा बिघडविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सोशल मीडिया किंवा अन्य प्रसार माध्यमाद्वारे अतिशय वेगाने या समाजविघातक गोष्टींचा प्रसार होत आहे. त्यातून शहरामध्ये भडक माथ्याच्या तरुणांकडून दुकाने बंद ठेवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.  त्यातून शहराची दंगेखोर व असुरक्षित शहर म्हणून प्रतिमा बनू पाहत आहे. यासाठी सर्वपक्षीय, जातीय व धार्मिक सलोखा अबाधित  राहण्यासाठी  यापुढे कोणत्याही कारणासाठी मोहोळ शहर बंद ठेवायचे नाही, असा निर्णय यावेळी बैठकीत घेण्यात आला.

 या बैठकीसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आय, रिपब्लिकन पार्टी (आठवले गट), मनसे या प्रमुख राजकीय पक्षाबरोबरच मराठा सेवा संघ, दलित स्वयंसेवक संघ, संभाजी ब्रिगेड, भारतीय दलित महासंघ, छावा संघटना, भीम युवा प्रतिष्ठान, धनगर समाज संघटना, मुस्लिम समाज संघटना आदी संघटनांच्या प्रमुख  नेत्यांच्या उपस्थितीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस जि.प.चे माजी उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते दीपक (मेंबर)गायकवाड, प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर, उपनगराध्यक्ष शौकतभाई तलफदार, मोहोळ नागरी पतसंस्थेचे चेअरमन डॉ. कौशिक तात्या गायकवाड, मोहोळचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विक्रांत बोधे, मोहोळ तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष चेतन शहा, पद्माकर अप्पा देशमुख, उद्योगपती बाहुबली कवठे, सचिन कवठे, सेनेचे तालुकाप्रमुख काकासाहेब  देशमुख, शिवसेना ज्येष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड, भाजपाचे तालुका अध्यक्ष सतीश काळे, माजी सरपंच ब्रह्मदेव भोसले, प्रसिद्ध उद्योजक बाळासाहेब गवळी, भाजपचे मुख्य नेते संजय क्षीरसागर, नगरसेवक सत्यवान देशमुख, नगरसेवक मुश्ताक शेख, नगरसेवक अतुल गावडे, नगरसेवक संतोष खंदारे, संतोष दादा सुरवसे, आण्णा फडतरे युवा नगरसेवक तथा भाजप शहराध्यक्ष सुशील क्षीरसागर, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष तथा लोकनेतेचे संचालक प्रकाश चवरे, संतोष गायकवाड, नगरसेवक तथा गटनेते प्रमोद डोके, डॉ. प्रमोद पाटील, बिलाल शेख, सेनेचे जिल्हा उपप्रमुख दादासाहेब पवार, युवा सेनेचे महेश देशमुख, भारतीय दलित महासंघाचे संस्थापक संजीवदादा खिलारे, भीम प्रतिष्ठानचे संस्थापक अ‍ॅड. विनोद कांबळे, दिनेश घागरे, युवा उद्योजक प्रवीण नाना डोके, रिपब्लिकन पिपल फ्रंटचे अध्यक्ष धनंजय आवारे, मराठा सेवा संघाचे तानाजीराव चटके,  नागनाथ सोनवणे, हेमंत गरड, युवराज सकट, अ‍ॅड. हिंदुराव देशमुख, अ‍ॅड. हेमंत शिंदे, दलित स्वयंसेवक संघाचे जिल्हा अध्यक्ष मिलिंद अष्टुळ, किशोर पवार, दिनेश माने, शाहुराजे देशमुख, गौतम क्षीरसागर, रिपाइंचे राहुल तावसकर, बाळासाहेब जाधव, दिनेश धोत्रे, अर्जुनराव क्षीरसागर, सचिन कवठे, राजशेखर घोंगडे, दत्तात्रय  पुराणिक, भैय्या आंडगे, कांतीलाल भिवरे, भारत बरे, विनायक मोटे, अशोक बरकडे आदींसह बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते.