Tue, Jul 23, 2019 02:33होमपेज › Solapur › उजनी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट

उजनी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट

Published On: Jun 08 2018 8:01PM | Last Updated: Jun 08 2018 7:55PMबोंडले : विजयकुमार देशमुख

उजनी धरणातील पाणीसाठा दिवसें दिवस चिंताजनक होत चाललेला आहे दि.३० मे रोजी सकाळी ६  ते दि.८ जुन सायं ६ वाजेपर्यत या दहा दिवसांच्या कालावधीमध्ये धरणातील पाणीसाठा झपाट्याने खालावला आहे. या दहा दिवसांत तब्बल ७.३९ टीएमसी एवढा पाणीसाठा कमी झालेला आहे.  दिनांक ३० मे रोजी सकाळी ६ वा.  उणे ४.८६  टक्के असलेले उजनी धरण शुक्रवार दि.८ जून रोजी सायं. ६ वा. उणे १८.६५ टक्यांवरती गेलेले आहे.

दरम्यान उजनी उजवा कालव्याचे पाणी बुधवारी बंद करण्यात आलेले आहे. तसेच सध्या मुख्य कालव्यामधून डाव्या कालव्यास ९०० क्युसेस विसर्ग सुरू आहे. तर बोगद्याला सोडलेले पाणी धरणांमधील पाणीसाठा कमी होत असल्यामुळे आपोआपच कमी होऊ लागले आहे. बोगद्याचा विसर्ग १५० क्युसेस वरती आलेला आहे. शुक्रवार दि.८ जून रोजी सायं. ६ वाजता उजनी धरणामधून एकूण ३ हजार ५० क्युसेस विसर्ग सोडला जात होता.

उजनी धरणामधून भीमा नदीत सोडण्यात आलेला विसर्ग शुक्रवार दि. ८ जून रोजी सकाळी ९ वाजलेपासून कमी करण्यात आला आहेत. सध्या हा विसर्ग २ हजार क्युसेस करण्यात आलेला आहे. याचबरोबर पुणे जिल्ह्यातील  धरणांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी उपयुक्त पाणीसाठा आहे.  यामुळे उजनीच्या वरच्या बाजूला असलेली धरणे या वर्षी लवकर भरतील व उजनीत पाणी येईल अशी शक्यता निर्माण झाली आहे.