Fri, Jul 19, 2019 17:44होमपेज › Solapur › सोलापूर : उजनीत पाव टीएमसी पाणीसाठा वाढला

सोलापूर : उजनीत पाव टीएमसी पाणीसाठा वाढला

Published On: Jun 10 2018 12:33PM | Last Updated: Jun 10 2018 12:33PMबेंबळे : सिध्देश्वर शिंदे

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसामुळे उजनी धरणाच्या पाणीसाठ्यात 0.25 टीएमसी (पाव) वाढ झाली आहे. ही या पावसाळ्यातील पहिली वाढ आहे. 8 जुन रोजी उजनी धरणाचा पाणीसाठा -10.8 टीएमसी (-18.82%)होता.त्या पावसामुळे वाढ होवुन  9 जुन रोजी मायनसची पातळी भरत  -9.87 टीएमसी (-18.42%)झाला आहे.

उजनी धरणातुन सोलापुर शहरासह नदीकाठच्या गावातील नागरिकाना पिण्यासाठी व शेतीसाठी चालु आसलेला विसर्ग बंद करण्यात आला आहे.

औज बंधारा भरल्यामुळे भीमा नदीत सोडण्यात येणारे पाणी,बोगदा व सीनामाढा उपसा जलसिंचन योजनेतील ,विजनिर्मिती विसर्ग बंद केला असुन केवळ उजनी कालव्यातुन 700 क्युसेक चा विसर्ग चालु आहे.तो येत्या दोन दिवसात बंद करण्यात येणार असल्याचे उजनीचे अधिक्षक शिवाजी चौगुले यांनी सांगितले.

उजनीतुन भीमा नदीत 29 मे ला 600 क्युसेक ने पाणी सोडण्यात आले होते.त्यात वरवचेवर वाढ करत तो 9000 केला होता तर औज बंधार्यात पाणी पोहचल्यानंतर तो कमी कमी करत 850 क्युसेक वर आणला होता.तो काल सायंकाळी पुर्ण बंद करण्यात आला.12 दिवसात भीमा नदीतुन 5 टीएमसी पाणी सोडण्यात आले.या पाण्यामुळे सोलापूर करांची तहान तर भागणारच आहे.पण नदीकाठच्या पिकाना मोठे जीवदान मिळाले आहे.करपुन चाललेली पिके आता पुन्हा या पाण्यामुळे हिरवीगार होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान निर्माण झाले आहे. 

उत्तम पाणीनियोजन केल्यामुळे धरणसाठा समाधानकारक

 उजनी धरण 15 आँक्टोबर 2017 ला 111% भरले होते.123 टीएमसी पाणीसाठा झाला होता.असे दरवर्षी अपवाद वगळता उजनी भरते.पण नेहमी 1 मे च्या आधीच उजनी धरण मायनस पातळीत जाते.पण यावर्षी उजनी धरण जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता शिवाजी चौगुले यांच्या योग्य नियोजनामुळे उजनीतील पाणी सर्वांना योग्य प्रमाणात व योग्यवेळी मिळाल्यामुळे उजनी धरण  जवळपास एक महिना उशिरा मायनस मध्ये आले.सध्या मृतसाठ्यात का होईना पण पाणीसाठा चांगला राहिला आहे.

सध्या उजनीची पाणीपातळी पुढीलप्रमाणे ....
एकूण पाणीसाठा : 489.510 मी.
एकूण पाणीपातळी  : 1523.33 दशलक्ष घनमीटर
उपयुक्त पाणीपातळी ..वजा 279.48 दशलक्ष घनमीटर 
कालव्याद्वारे 700 क्युसेक विसर्ग
पाणीसाठा
एकुण पाणीसाठा : 53.79 टीएमसी 
उपयुक्त पाणीसाठा : वजा 9.87 टीएमसी