Sat, Jul 20, 2019 15:01होमपेज › Solapur › आठ दिवसात केवळ पाऊण टक्का वाढ, शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण 

उजनी धरण पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ 

Published On: Jul 07 2018 6:50PM | Last Updated: Jul 07 2018 6:44PMबेंबळे : प्रतिनिधी  

सोलापूर जिल्हाचे राजकारण,समाजकारण आणि अर्थकारण अवलंबून असलेल्या उजनी धरणातील पाण्यात संथ गतीने वाढ होण्यास सुरूवात झाली आहे. गेल्या आठ दिवसात पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने उजनी धरण क्षेत्रात वाढ झाली आहे.  

गतवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस जूनच्या तिसऱ्या आठवड्यात पावसाने पहिला टप्पा पुर्ण केला होता. मात्र यावर्षी जुलै उलटुन देखील समाधानकारक पाऊस न झाल्याने उजनीची स्थिती जैसे थे राहिली आहे. गेल्या वर्षी 20 जुलैला उजनी प्लस मध्ये आले होते. पण यावर्षी उजनी धरणात दौंड व बंडगार्डन येथुन येणाऱ्या पाण्यास सुरुवात देखील झालेली नाही. उजनी धरण सोलापुर जिल्ह्याला मिळालेले एक वरदान आहे ज्यामुळे सोलापुर जिल्ह्याचा चेहरा मोहरा पुर्ण बदलुन गेला.

मात्र, सध्या  उजनीचा पाणीसाठा मायनस मध्ये आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे लक्ष धरणाच्या पाणीसाठ्याकडे लागलेले आहे.सध्या उजनी धरणात केवळ 53.49 टीएमसी पाणी शिल्लक आहे. यातील 10 टीएमसी पाणी सध्या वापरले गेले आहे.

सध्या उजनी धरण पाणीपातळी पुढीलप्रमाणे ..
एकूण पाणीसाठा  489.407मी.
ए.पाणीपातळी...1514.80 दलघमी 
उपयुक्त पाणीपातळी..--288.01 दलघमी 
टक्केवारी ..--18.98* %
उजनी पाणलोट क्षेत्रात गेल्या महिनाभरात केवळ 242 मिमी पाऊस पडला आहे.