Mon, Apr 22, 2019 03:43होमपेज › Solapur › बेदम मारहाण केल्याप्रकरणी दोघांना पाच वर्षांचा कारावास

बेदम मारहाण केल्याप्रकरणी दोघांना पाच वर्षांचा कारावास

Published On: Jan 07 2018 2:04AM | Last Updated: Jan 06 2018 11:48PM

बुकमार्क करा
सोलापूर : प्रतिनिधी

जातीवाचक शिवागाळ करून बेदम मारहाण करणार्‍या दोघांना विविध कलमांखाली एकूण 5 वर्षांचा कारावास व प्रत्येकी 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 
दयाप्पा अरवत व नागनाथ अरवत (रा. कोरसेगाव) अशी शिक्षा सुनावलेल्यांची नावे आहे. याबाबत माहिती अशी की, 10 एप्रिल 2015 रोजी या प्रकरणातील फिर्यादी रस्त्यावरून जात असताना दयाप्पा अरवत व नागनाथ अरवत यांच्यासह नागनाथ अरवत, मयाप्पा अरवत, षडाक्षरी अरवत, सतीश अरवत, अशोक अरवत, कल्लाप्पा अरवत, मल्लिकार्जुन अरवत, लक्ष्मण अरवत, संगप्पा अरवत यांनी जातीवाचक शिवीगाळ केली. फिर्यादीच्या घरी जाऊन बाहेर ओढत आणून बेदम मारहाण केली.  तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. 

या प्रकरणात सरकारतर्फे एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले होते. त्यापैकी 3 प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांनी दिलेली साक्ष, परिस्थितीजन्य पुरावा ध्यानात घेऊन युक्‍तिवाद करण्यात आली. यातील दयाप्पा अरवत व नागनाथ अरवत या मुख्य आरोपींना विविध कलमांतर्गत 13 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. ही शिक्षा एकत्रित 5 वर्षे भोगावी लागणार आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी केला होता. सरकारतर्फे अ‍ॅड. प्रदीपसिंह रजपूत यांनी काम पाहिले.