Mon, Dec 17, 2018 15:26होमपेज › Solapur › खरिपाला दोनशे रुपयांचे अनुदान

खरिपाला दोनशे रुपयांचे अनुदान

Published On: Apr 21 2018 1:04AM | Last Updated: Apr 20 2018 8:06PMसोलापूर : महेश पांढरे 

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाल्याने चालू हंगामातील ज्या शेतकर्‍यांनी खरिपाची विविध पिके किमान आधारभूत किंमतीने शासनाच्या खरेदी केंद्रावर विक्री केली आहेत अशा शेतकर्‍यांच्या पिकाला आता प्रति क्विंटल दोनशे रुपयांचे अनुदान देण्यात येणार असल्याचे शासनाच्या सहकार व पणन विभागाने जाहीर केले आहे.

सन 2017-18 या आर्थिक वर्षात ज्या ज्या शेतकर्‍यांनी आपल्या खरिपाची विविध पिके शासनाने सुरू केलेल्या किमान आधारभूत किंमतीने खरेदी केंद्रावर विक्री केली आहेत अशा शेतकर्‍यांच्या पिकाला आता प्रति क्विंटल 200 रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. ज्या शेतकर्‍यांनी 5 ऑक्टोबरपासून धान्यांची विक्री केली आहे अशा शेतकर्‍यांना याचा लाभ देण्यात येणार आहे. चालू वर्षाच्या हंगामात अवकाळी पावसामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले होते. ते आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. प्रति शेतकर्‍यांना 5 क्किंटल धान्यासाठी हे अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना थोडीफार आर्थिक मदत मिळणार आहे. मात्र हे अनुदान ज्या शेतकर्‍यांनी शासनाच्या खरेदी केंद्रावरच धान्यांची विक्री केली आहे अशा शेतकर्‍यांनाच मिळणार असल्याचे शासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे बाजारात धान्य विक्री केलेले शेतकरी मात्र या अनुदानापासून वंचित राहणार आहेत.

Tags : Solapur, Two, hundred, rupees, grant, Kharip